तरुण भारत

पाकिस्तानात महिला पत्रकाराची हत्या

28 वर्षांमध्ये 61 पत्रकारांची झाली हत्या

वृत्तसंस्था/इस्लामाबाद

Advertisements

पाकिस्तानात एका महिला पत्रकाराची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. शाहीना शाहीन पाकिस्तान टीव्ही या शासकीय वाहिनीमध्ये निवेदिका तसेच पत्रकार म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच तिची बलुचिस्तानच्या तुरबतमध्ये बदली करण्यात आली होती. शाहीन पूर्वी मागील वर्षी मे महिन्यात उरुज इक्बाल या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली होती.  1992 पासून आतापर्यंत म्हणजेच 28 वर्षांमध्ये पाकिस्तानात 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. चालू आठवडय़ातच पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानात पत्रकार सुरक्षित असल्याचा दावा केला होता.

शाहीनची हत्या तिच्या घरात घुसून करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकरी फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शाहीनच्या कुटुंबीयांनी काही जणांवर याप्रकरणी संशय व्यक्त केला असून यात तिचा पतीही सामील आहे.

Related Stories

भारताचा रशियाबरोबर नौदल सराव

Patil_p

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द

datta jadhav

फ्रान्समध्ये संकट कायम

Patil_p

मास्कशिवाय सेल्फी, अध्यक्षाला मोठा दंड

Patil_p

ट्रम्प यांच्या विमानाचा अपघात टळला

datta jadhav

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, UN महासभेला करणार संबोधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!