तरुण भारत

सचिवालय परिसरात प्रार्थनास्थळांना स्थान

तेलंगणातील केसीआर सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisements

तेलंगणाच्या हैदराबादमध्ये उभारल्या जाणाऱया नव्या सचिवालय परिसरात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सरकार मंदिर, मशीद आणि गुरुद्वाराची निर्मिती करविणार आहे. गंगा-यमुना संस्कृतीच्या प्रतीकाच्या स्वरुपात सचिवालयात मंदिर, मशीद आणि गुरुद्वारासाठीची कोनशिला स्वतः मुख्यमंत्री ठेवणार आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिनी या सर्व धार्मिकस्थळांच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे.

हैदराबादच्या प्रगती भवन येथे मुख्यमंत्री आणि मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींमधील बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसीही सामील झाले आहेत. 1 मंदिर आणि दोन मशिदींची निर्मिती होणार असल्याचे केसीआर यांनी सांगितले आहे.

सचिवालय परिसरात 750-750 चौरस यार्डच्या दोन मशिदी आणि 1500 चौरस यार्ड क्षेत्रात एक मंदिर उभारण्यात येणार आहे. मशिदीच्या परिसरात इमाम क्वार्टरही निर्माण करण्यात येईल. याचबरोबर सचिवालय परिसरात एक चर्चही उभारण्यात येणार आहे.

पाडकामावेळी नुकसान

मुख्यमंत्री केसीआर यांनी यापूर्वी जुने सचिवालय भवन पाडविण्यावेळी जमीनदोस्त झालेले मंदिर तसेच दोन मशिदी पुन्हा उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिराच्या उभारणीनंतर ते सरकारच्या विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. तर मशीद सुन्नी वक्फ मंडळाकडे सुपूर्द केली जाणार आहे. 

Related Stories

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 614 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

Patil_p

गुजरातची पुनरावृत्ती आंध्रात होणार ?

Patil_p

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांचे निधन

datta jadhav

हिंसाचार थांबल्याशिवाय सुनावणी नाही

Patil_p

औरंगाबादमध्ये 54 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्याचा आकडा 1173 वर

Omkar B

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट

Amit Kulkarni
error: Content is protected !!