22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

‘गांधी’गिरीवर पुन्हा लेटरबॉम्ब

कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन काम करा : पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींचे सोनियांना सल्लेवजा पत्र

लखनौ, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले. त्यातून त्यांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील काही नेत्यांनी आणखी एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रातून केवळ गांधी कुटुंबाच्या मोहातून बाहेर पडून काम करण्याचा सल्ला हायकमांडना देण्यात आला आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा पक्षासह देशपातळीवरील राजकारण चांगलेच ढवळून निघण्याची शक्मयता आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधींवरही निशाणा साधण्यात आला आहे. चार पानांच्या पत्रात सोनिया गांधींनी ‘कुटुंबाच्या मोहापासून’ वर यावे आणि पक्षाच्या लोकशाहीवादी परंपरा पुनर्स्थापित कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठविले आहे. गेल्या वषी काँग्रेसच्या नऊ नेत्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. या नेत्यांनीच वेगळे धाडस करत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. गांधी कुटुंबाच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन काम करा असा सल्ला पत्रातून देण्यात आला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी-वधेरा यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत सोनिया गांधींना कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन पक्षाच्या लोकशाही परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन पत्रातून केले आहे. उत्तर प्रदेशमधील माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह या नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत. 

पक्ष संघटनेबाबत नाराजीचा सूर

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. राज्य प्रभारी तुम्हाला सद्यस्थितीबद्दल माहिती देत नसल्याची भीती आहे. आम्ही जवळपास एका वर्षांपासून तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत आहोत. पण, आम्हाला वारंवार वेळ नाकारली जात आहे. आम्ही आमच्या हद्दपारीविरोधात अपील केले होते. जे अवैध होते. परंतु, समितीलासुद्धा आमच्या आवाहनावर विचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. खरेतर, आम्हाला प्रसारमाध्यमांमधून आमच्या हद्दपारीविषयी माहिती मिळाली होती. पण पक्षाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे.

जे लोक पगाराच्या आधारावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत, त्यांच्याकडे पक्षाची पदे आहेत. हे नेते पक्षाच्या विचारधारेशी परिचित नाहीत, परंतु त्यांना उत्तरप्रदेशमध्ये पक्षाला दिशा देण्याचे काम देण्यात आलेले आहे. हे लोक 1977-80 च्या संकटकाळात काँग्रेसबरोबर उभे राहिलेल्या नेत्यांच्या कामगिरीचे आकलन करत आहेत. लोकशाहीचे निकष मोडकळीस आणले जात आहेत. तसेच ज्ये÷ नेत्यांना लक्ष्य केले जात असून त्यांचा अपमान केला जात आहे आणि त्यांना काढून टाकले जात आहे, असा दावाही पत्रातून करण्यात आला आहे.

दुर्लक्ष केल्यास फटका अटळ!

नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील एनएसयूआय आणि युवा काँग्रेस निष्क्रिय झाले आहेत. वरि÷ नेत्यांशी संवाद वाढविण्यासाठी काँग्रेस हायकमांडचे लक्ष वेधण्यात आले आहे. सध्याच्या घडामोडींकडे डोळेझाक केली गेली तर एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, असेही पत्रातून सांगण्यात आले आहे.

Related Stories

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कोरोनाचा संसर्ग

pradnya p

दिल्लीच्या परिस्थितीत सुधारणा; सोमवारी आढळले केवळ 65 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

7 महिन्यांनी झायरा वसीम सक्रीय

Patil_p

लसीकरण आता 24 तास

Patil_p

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 449 नव्या रुग्णांची नोंद

pradnya p

वादग्रस्त अधिकाऱयाला पश्चिम बंगालमध्ये बढती

Patil_p
error: Content is protected !!