तरुण भारत

दहा रुपायांसाठी 50 हजारांना लुबाडले

प्रतिनिधी/ म्हापसा

जॉगवर कंपनीच्या टॉयलेटच्या 10 रुपयांच्या पार्टसाठी तब्बल 50 हजार रुपयांना  पाच मिनिटाच्या अवधीत पाळी काणका येथील नागरिक प्रभाकर यशवंत मांद्रेकर यांना लुबाडले. त्यांनी याप्रकरणी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मांद्रेकर यांच्या स्टेट बँक ऑफ म्हापसा शाखेतील खात्यातून 39 हजार दहा रुपये, 9 हजार 981 रुपये व 499 रुपये मिळून 49490 रुपये काढले आहेत. 

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार दि. 3 रोजी जॉगवर कंपनीला आपला टॉयलेटचा पार्ट गेला म्हणून फोन केला होता. दुसऱया दिवशी सकाळी 10.15 वा त्यांनी आपल्याला फोन करून 39010, 9081 व 499 असा कोड दिला. त्यानंतर त्यांनी आपला बँक खाते नंबर मागून खात्यातील 49990 रुपये काढले. पैसे काढल्याचा मॅसेज आल्यावर आपल्याला लुबाडले गेल्याचे समजले. त्यानंतर त्वरित म्हापसा पोलीस व स्टेट बँक म्हापसा शाखा व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केल्याचे केल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले. म्हापसा पोलिसांनी तक्रार नोंद करून घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

फोटो

Related Stories

रस्ता करात सूट दिल्याने सरकारचाही फायदाच

Patil_p

आवेर्तान ‘इन’:, लुईझिन ‘आऊट’

Amit Kulkarni

नितीश बेलुरकरला अ. गो. ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद

Amit Kulkarni

मुख्यमंत्रीपदाचे समाधान ‘स्वयंपूर्ण गोवा’ने मिळाले

Omkar B

सातपैकी एक रुग्ण कोरोनामुक्त

Omkar B

जॉय काकोडकर तिसवाडी बुद्धिबळ रॅपीड स्पर्धेचा विजेता

Amit Kulkarni
error: Content is protected !!