तरुण भारत

नैऋत्य रेल्वे पुन्हा सुरू करणार 7 रेल्वे

प्रतिनिधी/ बेळगाव

रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रमुख मार्गावर लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील नैऋत्य रेल्वे विभागात एकूण 7 रेल्वे पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. यातील काही रेल्वे दररोज तर काही निवडक दिवसांसाठी धावणार आहेत. लॉकडाऊन नंतर रेल्वे मंत्रालयाकडून लांब पल्ल्याच्या रेल्वे हळू हळू सुरू केल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांना इतर राज्यांमध्ये जाणे शक्मय होणार आहे. परंतु या सातपैकी एकही रेल्वे ही बेळगाववरून धावणार नसल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.

Advertisements

नैऋत्य रेल्वेने बेंगळुर-म्हैसूर, बेंगळूर – गुवहाटी, यशवंतपूर – बिकानेर, जयपूर- म्हैसूर, म्हैसूर -सोलापूर, गोरखपूर – यशवंतपूर, बेंगळूर – नवी दिल्ली या रेल्वे धावणार आहेत. 12 सप्टेंबर पासुन या रेल्वे या मार्गांवर धावणार असून यासाठी 10 सप्टेंबर पासून रेल्वे बुकींग सुरू केले जाणार असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

Related Stories

पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय

Amit Kulkarni

शहराचा पारा पोहोचला 35 अंशावर

Omkar B

बैलगाडीच्या धडकेत कारचालक जखमी

Abhijeet Shinde

उचगाव येथील ट्रक्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण आज

Patil_p

वेंगुर्ला रोडवरील ‘त्या’ पुलाची पुनर्बांधणी करा

Amit Kulkarni

सदलगा येथे पंजाभेटी, पीर मिरवणूक रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!