तरुण भारत

दिल्लीत 3256 नवे कोरोना रुग्ण; 29 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 3256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 91 हजार 449 वर पोहचली आहे. यामधील 20, 909 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे रविवारी 2188 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 65 हजार 973 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 17 लाख 80 हजार 512 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 9217 आरटीपीसीआर टेस्ट आणि 26,829 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन? केजरीवाल सरकारचा केंद्र सरकारला प्रस्ताव

Rohan_P

जानेवारीत होऊ शकते संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

datta jadhav

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईमेलद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Rohan_P

जयपूरच्या ज्वेलरी ग्रूपवर छापा, कोटय़वधींचा काळा पैसा उघड

Patil_p

‘या’ दोन राज्यांनी छापली स्वत:ची लसीकरण प्रमाणपत्रे,मोदींचा फोटो हटवला

Abhijeet Shinde

…तर अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!