तरुण भारत

कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा

ऑनलाईन टीम / मुंबई : 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा पुरविण्यात आली आहे. कंगनाने याबद्दल ट्विट करून गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. 

Advertisements

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. मी अमित शाह यांची आभारी आहे. सध्याची परिस्थिती पाहता ते मला काही दिवसांनी मुंबईत येण्याचा सल्ला देऊ शकत होते. मात्र, त्यांनी भारताच्या मुलीने दिलेल्या वचनांचा मान ठेवला. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसम्मनाची लाज राखली.’

काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यावर कंगनाने हे चॅलेंज स्विकारून मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, हिम्मत असेल तर अडवून दाखवा असे, म्हटले होते. 

त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून तिला ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

DRDO ने तयार केली ड्रोनविरोधी यंत्रणा

datta jadhav

गौरी लंकेश हत्या: सहा आरोपींची जामीन याचिका कोर्टाने फेटाळली

Abhijeet Shinde

ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये विष पार्सल

datta jadhav

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ भाजपाचेच कार्यकर्ते ?

Abhijeet Shinde

पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 7 टप्प्यात होणार निवडणुका

datta jadhav

चार वर्षाच्या मुलीला कोरोना, पालकांवर गुन्हा दाखल

prashant_c
error: Content is protected !!