तरुण भारत

पेटीएमचा वित्त वर्ष 2020 मध्ये महसूल वाढून 3,629 कोटीच्या घरात

नवीदिल्ली: डिजिटल स्वरुपाने वित्तीय सेवा देणाऱया पेटीएम कंपनीला वित्त वर्ष 2020 मध्ये महसूल वाढून 3,629 कोटी रुपयाच्या घरात पोहोचलेला आहे. सर्व सेगमेंटमध्ये डिजिटल आणि पाँईट ऑफ सेल उपकरणाच्या आधारे व्यवहारात वधार झाल्याने उत्पन्नात वाढ झाली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. वित्त वर्ष 2020 मध्ये कंपनीचा तोटा वर्षाच्या आधारे 30 टक्क्मयांनी कमी आला आहे. वित्त वर्ष 2019 मध्ये पेटीएमला 4217.20 कोटीचा तोटा झाला होता. जो वित्त वर्ष 2020 मध्ये घटून 2942.36 कोटीवर आला होता. तसेच कंपनीचा महसूल 3,579.6 कोटी रुपये राहिला आहे. तसेच सध्याच्या काळात कंपनीच्या खर्चात कपात करण्यात आली आहे. आम्ही भारतीय नागरिकांना डिजिटल वित्तीय सेवांच्या आधारे सशक्त बनविण्याच्या दिशेने काम करत असल्याचे पेटीएमचे अध्यक्ष मधुर देवरा यांनी सांगितले आहे. कंपनीची वाटचाल येत्या 2022 पर्यंत नफ्याच्या दिशेने करण्यात येणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आगामी वर्षामध्ये पेटीएम पोस्टपेड, पेटीएम मनी आणि पेटीएम इन्शुरन्स सेवांच्या आधारे कंपनीचे उत्पन्न वाढविण्याचे ध्येय निश्चित करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

युटीआय म्युच्युअलचे आयपीओमधून 3,500 कोटी उभारण्याचे ध्येय

Patil_p

नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत निर्यातीत 18 टक्के वाढ

Patil_p

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम

Patil_p

अदानी गॅसचे होणार नामकरण

Patil_p

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

Amit Kulkarni

इंडिगोची दोन आसने बुकींगची विशेष योजना

Patil_p
error: Content is protected !!