तरुण भारत

बिडेन अन् ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक : बिडेन यांना किंचित आघाडी

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

लेबर डेनंतर अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अधिकच तणावपूर्ण झाल्याचे चित्र आहे. डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांना किंचित आघाडी प्राप्त झाली असून ती राखण्याचा जोरदार प्रयत्न ते करत आहेत. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडी भरून काढण्यासाठी शक्ती पणाला लावत आहेत. ऑगस्टमध्ये दोन्ही पक्षांच्या अधिवेशनानंतर काही खासगी सर्वेक्षणे झाली आहेत. या सर्वेक्षणानुसार अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच कोरोनाचा प्रभाव अधिक राहिलेल्या प्रांतात ट्रम्प पुनरागमन करत आहेत. तर ट्रम्प यांच्याविरोधातील नाराजीवर स्वार होण्याचा प्रयत्न बिडेन करत आहेत.

लेबर डेनंतर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारास प्रारंभ होतो. 1992 च्या जॉर्ज बुश यांच्याकाळापासून हे होत आले आहे. फ्लोरिडा सारख्या प्रांतांमध्ये विजय आवश्यक आहे. ट्रम्प यांनी तेथेच जोर लावला आहे. ट्रम्प यांनी बिडेन आणि डेमोक्रेटिक पार्टीवर समाजकंटकांबद्दल सहानुभूती बाळगल्याचा आरोप केला आहे. बिडेन यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यास मागील आठवडय़ापासून सुरुवात केली आहे.

श्वेतवर्णीयांमध्ये ट्रम्प लोकप्रिय

विस्कॉन्सिन आणि मिनेसोटा यासारख्या श्वेतवर्णीयांची संख्या अधिक असलेल्या प्रांतांमध्ये ट्रम्प यांना मोठा पाठिंबा आहे. तेथे श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय मतदारांना विभागण्याचा प्रयत्न सुरू आहे. फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना, एरिजोना आणि जॉर्जिया यासारख्या प्रांतांमध्ये ट्रम्प बचावात्मक भूमिकेत दिसून येत आहेत. काही प्रांतांमध्ये सध्या बिडेन यांना आघाडी दिसून येत असली तरीही तेथील स्थिती सहजपणे ट्रम्प यांच्या बाजूने होणार असल्याचे रिपब्लिकन नेत्यांचे मानणे आहे. काही शहरांमध्ये हिंसाचार झाल्याने मतदानावर परिणाम होणार आहे. विस्कॉन्सिन सारख्या प्रांतात बिडेन यांना फारसे समर्थन मिळताना दिसून येत नाही.

अर्थव्यवस्था अन् कोरोना

लवकरच अर्थव्यवस्था आणि कोरोना महामारीवर भर द्यावा लागणार असल्याचे बिडेन जाणून आहेत. मिशिगन आणि पेन्सिलवेनिया यासारख्या प्रांतांमधील मतदार कुणाच्या मागे उभे राहणार हे अद्याप अस्पष्ट आहे. याचमुळे बिडेन तेथे अधिक प्रचार करत आहेत. दंगलग्रस्त केनोशा आणि पिट्सबर्ग या शहरामंध्ये जात त्यांनी कृष्णवर्णीयांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

बिडेन यांच्याकडील आघाडी खूपच कमी असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. परंतु बिडेन अनेक ठिकाणी स्वतः पोहोचू शकलेले नाहीत. ही कमतरता लवकर दूर केली जावी अशी डेमोक्रेट्सची इच्छा आहे. 2016 मध्ये विस्कॉन्सिन यासारख्या प्रांतात हिलरी क्लिंटन यांना याचा फटका बसला होता. बिडेन जितक्या अधिक शहरात जातील, तेवढा त्यांना लाभ होणार आहे. ट्रम्प याप्रकरणी आघाडीवर असल्याचे उद्गार डेमोक्रेट खासदार मार्क पोकन यांनी काढले आहेत.

संकट ओढवून घेणे

ट्रम्प अनेकदा स्वतःसाठीच अडचणी निर्माण करतात. सैनिकासंबंधीच्या त्यांच्या कथित विधानामुळे काही लोक नाराज झाले असून डेमोक्रेट्स त्याचा लाभ उचलू पाहत आहेत. ट्रम्प यांच्यासमोर प्रचारात आर्थिक अडचणीही दिसून येत आहेत. ते टीव्हीवर प्रचारासाठी खर्च करत आहेत. तर ऑगस्टमध्ये बिडेन यांनी 365 दशलक्ष डॉलर्स जमविले आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावरून ट्रम्प यांची कोंडी करण्याची तयारी बिडेन यांनी चालविली आहे.

सर्वेक्षणांचे आयोजन

ट्रम्प प्रचारमोहिमेने स्वतः देखील अनेक सर्वेक्षणे करविली असून त्याचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचे सांगण्यात येते. अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ावर ट्रम्प अद्याप अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. लोक महामारीमुळे त्रस्त असून हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. शाळा आणि व्यवसाय बंद असल्याचे रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या लेजिन हिके यांनी सांगितले आहे.

Related Stories

पाऊस अन् हिमवृष्टीवर नियंत्रण मिळविणार चीन

Patil_p

माजी लष्करी अधिकारी 45 वर्षानंतर मध्यरात्री फासावर

prashant_c

ईडीकडून नीरव मोदीची 330 कोटींची संपत्ती जप्त

datta jadhav

कोरोनामुळे मज्जासंस्थेचे विविध विकार

Patil_p

सादत रहमानला ‘जागतिक शांतता पुरस्कार’ जाहीर

datta jadhav

मुशर्रफना फाशी सुनावणाऱ्या न्यायाधीशाचा कोरोनाने मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!