तरुण भारत

होंडा मोटारसायकल्सची 2 टक्के विक्री घटली

नवी दिल्ली

 ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कुटर इंडियाने ऑगस्ट 2020 मध्ये वाहन विक्रीत घट नोंदवली आहे. कंपनीची विक्री ऑगस्टमध्ये 2 टक्के घटून 4 लाख 43 हजार 969 इतकी झाली आहे.  मागच्या वर्षी कंपनीने याच महिन्यात 4 लाख 52 हजार 551 दुचाकींची विक्री केली असल्याचे सांगण्यात येते. कंपनीच्या दुचाकींच्या स्थानिक विक्रीत मात्र सुधारणा दिसली असून ती 1 टक्के वाढली आहे. स्थानिक विक्री 4 लाख 28 हजार 231 इतकी होती. याच महिन्यात कंपनीने 15 हजार 738 वाहनांची निर्यात केली आहे, जी मागच्या वर्षी याच महिन्यात 26 हजार 887 इतकी होती. ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत बऱयापैकी कामगिरी कंपनीने नोंदवली असून येणाऱया काळात यात आणखी सुधारणा दिसतील.  

Advertisements

Related Stories

‘सोनालिका’ समूहाकडून शेतकऱयांसाठी ऍपची सुविधा

Amit Kulkarni

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

Patil_p

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

नेक्सन इलेक्ट्रिक वाहन विक्री 2 हजारच्या टप्प्यावर

Patil_p

मर्सिडीजची विक्री 65 टक्क्यांनी मजबूत

Amit Kulkarni

पुढील वर्षी कियाची नवी कार?

Amit Kulkarni
error: Content is protected !!