तरुण भारत

डीआरडीओची हायपरसॉनिक भरारी

स्वदेशी नवतंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी : अग्नि क्षेपणास्त्राचा बूस्टर म्हणून वापर : एअर डिफेन्सला कळण्याआधीच होणार प्रहार

बालासोर / वृत्तसंस्था

Advertisements

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत स्वतःचे हायपरसॉनिक तंत्रज्ञान विकसित करणारा चौथा देश ठरला आहे. स्वदेशी नवतंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतल्यामुळे ‘डीआरडीओ’ची ताकद आता आणखीनच वाढली आहे. ‘डीआरडीओ’च्या वतीने ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर व्हेईकल (एचएसटीडीव्ही) चाचणी घेण्यात आली. हे हवेतील आवाजाच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने हल्लाबोल करू शकते. तसेच शत्रूराष्ट्राच्या हवाई संरक्षण यंत्रणेला कळण्याआधीच त्यांना नेस्तनाबूत करण्याची ताकद भारताला प्राप्त झाली आहे.

बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली. सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि क्षेपणास्त्राचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेईकलची ही चाचणी होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे तंत्रज्ञान विकसित केले असून डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाईल टीमने ही चाचणी केली.

हायपरसॉनिक चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील पाच वर्षात भारत स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करु शकते, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राचा वेग प्रतिसेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. 

अतिवेगवान चाल हे वेगळेपण

अन्य क्षेपणास्त्रे बॅलेस्टिक ट्रजेक्टरी फॉलो करतात. म्हणजेच सहजतेने त्या क्षेपणास्त्रांच्या मार्गावर लक्ष ठेवता येते. अशा क्षेपणास्त्रांमुळे शत्रूला तयारी करण्याचा आणि प्रतिहल्ला करण्याची संधी मिळते. पण हायपरसॉनिक शस्त्राचा कोणताही निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. तसेच हल्ल्याचा वेग इतका प्रचंड असतो की, शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार केला जाऊ शकतो.

एचएसटीडीव्हीची वैशिष्टय़पूर्णता

हे स्क्रॅमजेट विमान लांब पल्ल्याची आणि हायपरसनिक क्रूझ क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकते. आवाजापेक्षा 6 पट वेगवान म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱयात असलेल्या शत्रूचे लपलेले ठिकाण एका तासाच्या आत लक्ष्य केले जाऊ शकते. सामान्य क्षेपणास्त्रे बॅलेस्टिक मार्गक्रमण करत असल्यामुळे त्यांचे मार्ग सहज ट्रक केले जाऊ शकतात. मात्र हायपरसॉनिक शस्त्रास्त्र यंत्रणा निश्चित मार्गावर चालत नाही तर हे शत्रूला आक्रमण करण्याची तयारी आणि प्रतिकार करण्याची संधी देते.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपट वेगवान प्रवास करते. याचे दोन प्रकार असून पहिला हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि दुसरे हायपरसॉनिक ग्लाइड वाहन असे संबोधले जाते. हे क्षेपणास्त्र अवघ्या काही मिनिटांमध्ये लक्ष्य नष्ट करू शकते.

निवडक देशांकडेच सदर तंत्रज्ञान

सध्या अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडेच या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. पारंपरिक पेलोडवर लक्ष केंद्रित करणाऱया अमेरिकेबरोबर चीन आणि रशिया पारंपरिक व्यतिरिक्त अणुपुरवठय़ावरही काम करत आहेत. जगातील कोणत्याही देशात सध्या आपली संरक्षण यंत्रणा नाही. अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉन यावर संशोधन करत आहे.

Related Stories

दिलासादायक : दिल्लीत एका दिवसात 2411 रुग्णांना डिस्चार्ज

Rohan_P

पंजाब काँगेसमध्ये सिद्धूंना वाढता विरोध

Patil_p

दिल्लीसह 7 राज्यात बर्ड फ्लूचे संक्रमण

Patil_p

लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

Abhijeet Shinde

दिल्लीत 154 नवीन कोरोनाबाधित

Rohan_P

केंद्राकडून राज्यांना 43.79 लसींचा पुरवठा

Amit Kulkarni
error: Content is protected !!