तरुण भारत

चंदा कोचर यांच्या पतीला अखेर अटक

आयसीआसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणी ईडीची कारवाई

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने सोमवारी रात्री अटक केली. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन केस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. आयसीआयसीआयने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

चंदा कोचर यांनी एमडी आणि सीईओ असताना पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉनला कर्ज मंजूर केले होते. याप्रकरणी सोमवारी दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीतून घोटाळय़ाशी संबंधित बाबींचा उलगडा होताच ईडीच्या अधिकाऱयांना त्यांना अटक केली.

व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे. चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात ईडीने गुन्हा नोंदवला होता.

चंदा कोचर यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती. जगभरातल्या बँकिंग सेक्टरमध्ये त्यांचे मोठे नाव झाले होते. एक व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ते आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ, एमडी असा त्यांचा प्रवास आहे. याच चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आयसीआयसीआयने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडीओकॉन ग्रुपने कर्जाच्या 86 टक्के रक्कम चुकवली नव्हती. 2017 मध्ये हे कर्ज एनपीएमध्ये टाकण्यात आले होते. व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी 2010 मध्ये न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला 64 कोटी रुपये दिले होते.

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 7 लाखाचा टप्पा

datta jadhav

खुशी कपूरचे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत

Patil_p

इस्त्रायलने मानले एअर इंडियाचे आभार

tarunbharat

निर्जंतुकीकरण टनेल ठरू शकतो धोकादायक

Patil_p

नव्या स्टार्टअप्ससाठी 1 हजार कोटींचा निधी

Patil_p

एच. विश्वनाथ, योगेश्वर यांच्यासह पाच जण विधानपरिषदेवर

Patil_p
error: Content is protected !!