तरुण भारत

हर्णैत बोट बुडून 40 लाखांचे नुकसान

वादळी पावसाचा तडाखा, -8 होडय़ा गेल्या वाहून

वार्ताहर/ हर्णै

Advertisements

दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे एक बोट बुडाली. या बोटीत 7 खलाशी होते, परंतु त्यांना वाचवण्यात आले. यात बोट मालकाचे 40 लाखांचे नुकसान झाले आहे. 8 लहान होडय़ा वाहून गेल्या आहेत.

   सोमवारी पहाटे 4 वाजता मासेमारीसाठी जाणारी महेश रघुवीर यांच्या मालकीची परमेश्वरी बोट रविवारी सर्व साहित्य सामुग्रीसह बंदरात उभी होती. या बोटीसोबत अन्य बोटीदेखील होत्या. रविवारी अचानक वादळी पावसामुळे रघुवीर यांची परमेश्वरी बोट तेथील अन्य बोटींवर धडकली व फुटून बुडाली. यानंतर या बोटीतील 7 खलाशांनी पाण्यात उडय़ा मारल्या, परंतु त्यांना बाजुच्या बोटींवर असलेल्या खलाशांनी सुखरूप बाहेर काढले.

  त्याचबरोबर तेथील 10 ते 12 बोटींचे 30 ते 40 हजारांचे नुकसान झाले. त्याचबरोबर याठिकाणी निसर्ग चक्रीवादळात पडलेल्या एईडी लाईटचा खांब जमिनदोस्त झाला आहे. त्यामुळे तेथे मच्छीमारांना अंधाराशी सामना करावा लागत आहे.

Related Stories

युवासेनेची बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक

Patil_p

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘यंग ब्रिगेड’ला उद्यापासून लस

NIKHIL_N

रत्नागिरी : अखेर ‘त्या’ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरू लागला

Abhijeet Shinde

‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवर धक्काबुक्की

NIKHIL_N

सेनेच्या माजी उपसभापतीने केली रायपाटनच्या सरपंचांना मारहाण

Abhijeet Shinde

एनडीए परीक्षार्थींसाठी कोकणातून रेल्वेच्या विशेष गाडय़ा

Patil_p
error: Content is protected !!