तरुण भारत

स्वप्नीलचा मुस्तफाशी परिचय होता का?

प्रतिनिधी/ मडगाव

स्वप्नील वाळकेचा खून होऊन सात दिवस पूर्ण झाले तरी या खुनामागचे कारण शोधण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही. ज्या पद्धतीने आरोपी मुस्तफा शेख दुकानात घुसला व त्याने थेट  स्वप्नीलवर गोळी झाडली, यावरून स्वप्नील व मुस्तफा यांचा एकमेकांकडे परिचय होता का? असा सवाल तपासादरम्यान उपस्थितीत झालेला असून पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करीत आहेत.

गुन्हेगार मुस्तफा शेख, ओsंकार पाटील व एव्हेंडर रॉड्रिगीस यांनी स्वप्नीलच्या खुनाचा कट आखला होता हे आतापर्यंत पोलीस तपासात स्पष्ट झालेले आहे. त्यात मुस्तफा शेख याने स्वप्नीलवर गोळी झाडली हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. मुस्तफा दुकानात शिरल्यानंतर स्वप्नीलकडे कोणतेच संभाषण केले नव्हते. त्याने थेट गोळी झाडली होती. त्यामुळे मुस्तफा व स्वप्नील यांचा एकमेकांशी परिचय होता का? असा सवाल तपास यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.

स्वप्नीलने चोरीचे दागिने खरेदी केले काय?

एव्हेंडर रॉड्रिगीस याने हणजुण येथील आपल्या जवळच्या नातेवाईकांचे मोठय़ा प्रमाणात दागिने लंपास केल्याचा आरोप होत आहे. हे दागिने लंपास केल्यानंतर एव्हेंडरने आपल्या नातेवाईकांकडचा संपर्क तोडला होता. चोरीचे हेच दागिने स्वप्नीलने खरेदी केले होते का? याचा तपास सद्या पोलीस करीत आहेत.

आरोपीच्या कबुलीची सत्यता पडताळणे सुरुच

स्वप्नीलला मोठय़ा प्रमाणात सोन्याचे दागिने विकल्याची कबुली एका आरोपींने पोलिसांना यापूर्वीच दिलेली आहे. त्यात सोन्याच्या बांगडय़ा, अंगठय़ा तसेच इतर सोन्यांच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे सांगितले होते. तसेच हे सर्व दागिने आपल्या पत्नीचे असल्याची माहितीही त्याने तपासादरम्यान दिली होती. या कबूलीतील सत्यता पडताळून पाहण्याचे काम सद्या पोलीस करीत आहेत.

 सीआयडी पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा मडगावला भेट देऊन खून झालेल्या ठिकाणाची पहाणी केली. आणखी पुरावे हाती लागतात का? याची पहाणी केली. पिस्तुल कुठे खरेदी केले, चाकू कुठून प्राप्त केला यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जस्टिस फॉर स्वप्नील…

मंगळवार दि. 1 सप्टेंबर रोजी भर दुपारी मडगावात स्वप्नील वाळके या युवा ज्वेलरचा खून झाला आणि अवघ्या 16 तासांच्या आत संशयित आरोपींना अटक झाली. या खून प्रकरणाची सखोल व निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी त्यांच्या मित्र परिवाराकडून होत आहे. या मागणीचाच एक भाग म्हणून त्यांच्या मित्र परिवाराने तसेच हितचिंतकांनी ‘जस्टिस फॉर स्वप्नील’ ही मोहीम हाती घेतली आहे.

स्वप्नीलचा मित्र परिवार खुपच मोठा आहे. तसेच हितचिंतक देखील खुपच आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णी वाळके या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. सद्या सोशल मीडियावरून ‘जस्टीस फॉर स्वप्नील’ ही मोहीम राबविण्यात आली आहेत. अनेकांनी वॉटस्ऍपच्या डीपीत तसेच स्टेट्समध्ये ‘जस्टीस फॉर स्वप्नील’चे छायाचित्र वापरले आहे. फेसबुकवरून देखील ‘जस्टीस ऑफ स्वप्नील’ ही मोहीम राबविली जात आहे. त्यात स्वप्नीलच्या मारेकऱयांना माफ न करता, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. स्वप्नीलच्या खून प्रकरणात कोणतेच राजकारण न करता, पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकजुटीने स्वप्नीलच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन देखील या मोहीमेतून करण्यात आले आहे.

Related Stories

आजाराचा बाजार करण्याचे भाजपचे धोरण आजही चालुच : अमरनाथ पणजीकर

Omkar B

नायजेरियन चाच्यांनी अपहरण केलेल्या गोमंतकीय युवकाचा मृत्यू

Patil_p

पेडणे तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ

Patil_p

भ्रष्ट मंत्री,आमदारांना सरकारातून त्वरित काढून टाका- किरण कांदोळकर

Patil_p

गोवा दूरदर्शनवर आजपासून ‘झिलबा राणो’

Omkar B

खलाशांना आणण्यास आज शेवटची संधी

Omkar B
error: Content is protected !!