तरुण भारत

कोरोना : महाराष्ट्रात 16,429 नवे रुग्ण; 423 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात 16,429 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 423 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 लाख 23 हजार 641 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 27 हजार 027 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Advertisements

काल दिवसभरात 14,922 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 6 लाख 59 हजार 322 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 36 हजार 934 रुग्ण उपचार घेत आहेत. 


राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 71.38 % आहे. तर मृत्यू दर 2.93 % इतका आहे. सध्या राज्यात 15 लाख 17 हजार 066 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 9 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • शहरे  ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 
  • मुंबई : 24,150
  • ठाणे : 25, 703
  • पुणे : 61,781
  • नाशिक : 9,676
  • नागपूर : 17,088 

Related Stories

एकदम वीज बंद करून सुरू केली तर संपूर्ण देश अंधारात जाण्याची भीती

prashant_c

मिरज : रोझावाडी येथील माजी उपसरपंचाचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

परप्रांतीयांकडून वैद्यकीय अधिकारी पोलिसांना शिवीगाळ

Abhijeet Shinde

तालुकास्तरावर दर 3 महिन्यांनी होणार सरपंच सभा- मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

लस नाही तर पगार नाही…पिंपरी चिंचवड आयुक्तांचा निर्णय

Rohan_P

सांगली : मणेराजूरीत चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!