तरुण भारत

अंतिम वर्षाची परिक्षा असणार बहुपर्यायी स्वरुपाची

विद्यापीठाच्या विद्यापरीषदेत निर्णय, 50 मार्कांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

शिवाजी विद्यापीठाअंतर्गत असणार्‍या महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा प्रश्न अखेर सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरीषद बैठकीत सुटला. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (ऑप्शनल) असणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरीषदेची बैठक सोमवारी ऑनलाईन पद्धतीने पर पडली. यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. रविवारी (ता.6) अधिष्ठाता मंडळ, अधिकार मंडळ आणि परीक्षा विभागाची बैठक झाली होती. यामध्ये परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर एकमत झाले. मात्र या परीक्षा कधी आणि कशा प्रकारे घ्यायच्या याबाबतचा अंतिम निर्णय विद्यापरीषदेच्या बैठकीत होणार होता. त्याप्रामाणे सोमवारी पार पडलेल्या विद्यापरीषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

अंतिम वर्षांच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. ही परीक्षा 50 गुणांची असणार असून सर्व प्रश्न वस्तूनिष्ठ आणि बहुपर्यायी असणार आहेत. ज्या विषयांची प्रात्यक्षिके झाली आहेत त्यांची 40 गुणांची परीक्षा होईल. 10 गुण प्रात्यक्षिकांचे असतील. ज्यांचे प्रात्यक्षिक झाले नाही त्यांची मात्र 50 गुणांची परीक्षा होणार आहे. ऑफलाईन परीक्षांचाही पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. यासाठी महाविद्यालये, शाळा ताब्यात घेऊन तेथे परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहिर केले जाणार आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा होऊन निकाल लावण्याचे आदेश युजीसीकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत परीक्षांसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडून युजीसीला करण्यात येणार आहे.

या बैठकीला प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.गजानन पळसे, विद्यापरीषदेचे 40 सदस्य, अधिष्ठाता यांच्यासह प्रशासकीय सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

ऑनलाईन परिक्षेसाठी सॉफ्टवेअरचा प्रश्न
ऑनलाईन परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका देणे, त्या तपासणे आणि त्याचे थेट गूण संबंधीत शिक्षकांना देणे यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. सध्या मात्र हे सॉफ्टवेअर शिवाजी विद्यापीठ तसेच पुणे विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे सॉफ्टवेअर विद्यापीठाला कधी आणि कसे मिळणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.

अंतिम वर्षांचे एकूण विद्यार्थी – 75,000
महाविद्यालये – 293
बॅकलॉगचे विद्यार्थी – 25,000
विषयनिहाय प्रश्नपत्रिका – 1600
विषय – 475

अशी असेल परीक्षा
परिक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
परिक्षा 50 मार्कांची असणार आहे.
प्रात्यक्षिक झालेल्या विषयांना तीच प्रश्नपत्रिका 40 गुणांची असणार आहे.
ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ठिकाणी प्रश्नपत्रिका एकच असणार आहेत.
परीक्षेसाठी एक तासाचा अवधी असणार आहे.

आता प्रतिक्षा वेळापत्रकाची
अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे विद्यापीठाच्या विद्यापरीषदेच्या बैठकीत ठरविण्यात आले. यामुळे परीक्षांबाबतच विद्यार्थ्यांमधील संभ्रम दुर झाला आहे. मात्र आता परीक्षांचे वेळापत्रक कधी जाहिर होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचे आव्हान विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. यामुळे परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून

Related Stories

एक्साईजने जप्त केलेल्या एक लाखाच्या दारूवर चोरट्यांचा डल्ला

Abhijeet Shinde

2 वर्षाच्या मुलासह आईची कोरोनावर मात

Patil_p

मनपाच्या विषय समिती सभापती निवडी आज

Abhijeet Shinde

इलेक्ट्रीक वाहनांना पालिकेत मोफत चार्जिंग

Patil_p

सांगली : अनुदान नको, हाताला काम द्या

Abhijeet Shinde

सांगली येथे तीन पेढींचे परवाने तीन दिवसांकरिता निलंबित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!