तरुण भारत

ड्रग रॅकेट: अभिनेत्री संजना चौकशीसाठी सीसीबीच्या ताब्यात


बेंगळूर/प्रतिनिधी

कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स प्रकरणी सीसीबीने चित्रपट अभिनेत्री संजना गलराणी यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर सीसीबीने तिला अटक केली आहे. इंदिरानगरमधील अभिनेत्री संजनाच्या घरावर छापा टाकल्यानंतर सीसीबीने अभिनेत्रीला अटक केली आणि तिला चौकशीसाठी कार्यालयात घेऊन गेले.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार संजनाचा मित्र रिअल इस्टेट उद्योजक राहुल याच्या विरोधात खटला दाखल झाल्यापासून संजना पोलिसांच्या देखरेखीखाली होती.

गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर आज सकाळपासूनच कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

Advertisements

Related Stories

मंत्र्यांच्या गनमॅन-वाहन चालकामध्ये क्षुल्लक कारणावरून मारामारी

Amit Kulkarni

मे महिन्याच्या प्रारंभी रुग्ण वाढण्याचा धोका

Amit Kulkarni

सहावी-आठवीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून पूर्णवेळ

Patil_p

दहावी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल

Amit Kulkarni

शाळा दत्तक घेण्याची संकल्पना आगामी काळात प्रेरणादायक

Patil_p

बेंगळूर, शिमोगा, बळ्ळारीत प्रादेशिक लसीकरण केंद्रे

Omkar B
error: Content is protected !!