तरुण भारत

चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी घसरणार ?

इंडिया रेटिंग्स व फिच या संस्थांकडून नोंदवला अंदाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास दरात(जीडीपी) 11.8 टक्क्मयांची घसरण राहणार असल्याचा अंदाज देशातील रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स ऍण्ड रिसर्च यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया रेटिंग्स यांच्याकडून 2020-21 साठीचा अंदाज मंगळवारी सादर केला आहे. वृद्धीचा दर हा उणे 11.8 टक्क्मयांवर राहणार असल्याचे सांगितले आहे.

या अगोदर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 5.3 टक्क्मयांची घसरण येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु रेटिंग्सच्या अंदाजानुसार आगामी 2021-22 च्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत 9.9 टक्क्मयांची वृद्धी होण्याचा अंदाज मांडला आहे. अशी स्थिती निर्माण होण्यास प्रामुख्याने मागील आर्थिक वर्षातील नकारात्मक परिणाम कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

देशाचा हा आर्थिक विकास मागील 1950-51 नंतर प्रथमच निर्माण होत असल्याचे भाकीत केलेले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मात्र जीडीपी उणे 23.9 टक्क्मयांनी घसरला आहे.

फिचकडून घसरणीचा अंदाज 10.5 टक्क्यांचा

चालू आर्थिक वर्षात 2020-21मध्ये फिच रेटिंग्स यांच्याकडून देशाचा आर्थिक विकासदर 10.5 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचा जीडीपी 23.9 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे जगातील प्रमुख अर्थक्यवस्थेच्या यादीत भारत सर्वोच्च स्थानी राहिल्याची नोंद केली आहे.

तसेच चालू आर्थिक वर्षातील तिसऱया म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये सुधारणा पहावयास मिळणार असल्याचा अंदाजही मंगळवारी फिच या रेटिंग्स कंपनीने नोंदवला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा काही प्रमाणात तरी रुळावर येण्यास प्रारंभ हेण्याचे संकेत क्यक्त केले आहेत. तर चालू  आर्थिक वर्षातील जीडीपीचा दर उणे 10.5 टक्क्मयांवर राहणार असल्याचा अंदाज मांडला आहे.

Related Stories

एल ऍण्ड टी नुकसानीत

Patil_p

बँक-आयटी कंपन्यांच्या समभाग विक्रीने सेन्सेक्स तेजीत

Patil_p

एल अँड टीला मिळाले कंत्राट

Patil_p

18 कोटी लोकांचे आधार-पॅन विनालिंकच

Patil_p

एचडीएफसी-रिलायन्सपेक्षाही टाटा समूह सरस

Omkar B

भारतात एमआयने विकले 50 लाख टीव्ही

Omkar B
error: Content is protected !!