तरुण भारत

रिलायन्सची ऑईल-केमिकल व्यवसायासाठी स्वतंत्र योजना

इंडिया रेटिंग्स व फिच या संस्थांकडून नोंदवला अंदाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ऑईल ते केमिकल या व्यवसायाला स्वतंत्रपणे विकसित करण्याचे ठरवले आहे. या संदर्भाची घोषणा मागील सहा महिन्याअगोदरच करण्यात आली असून आत या योजनेला गती देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. कंपनी ऑईल ते केमिकलचा व्यवसाय स्वतंत्रपणे वेगळाच करणार असल्याचे समजते.

कंपनी ऑईल टू केमिकलअंतर्गत रिफायनिंग, पेट्रोकेमिकल, रिटेल इंधन आणि बल्क होलसेल मार्केटिंग व्यवसांयासोबत त्यांच्या मालमत्ता देण्याघेण्याचे व्यवहारही होतील, असे कळते. या अगोदर कंपनीने एप्रिलमध्ये ऑईल ऍण्ड केमिकल व्यवसायाला रिलायन्स ओटूसी लिमिटेड नाव देण्यावर शिक्कामोर्तब केले होते.

रिलायन्स आपल्या रिफायनरी आणि केमिकल व्यवसायात 20 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. सौदी अरबची सरकारी तेल कंपनी सौदी अराम्कोसोबत संबंधीत व्यवहार होणार असून त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. साधारणत: हा व्यवहार 1.09 लाख कोटी रुपयांना होणार असल्याचे संकेत आहेत. या अगोदर रिलायन्सने ब्रिटनची मूळ कंपनी ब्रिटीश पेट्रोलियमला फ्यूल रिटेल वेंचरमध्ये 49 टक्के हिस्सेदारी विकली आहे.

सदर व्यवसायामध्ये रिलायन्स इथेन होल्डिंग लिमिटेड, रिलायन्स गॅस पाईपलाईन, गुजरात केमिकल पोर्ट, रिलायन्स कॉर्पोरेट आयटी पार्क, रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फास्ट्रक्चरसह अन्य मालमत्तांना रिलायन्स ओटूसीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

Related Stories

प्रमुख बंदरांमधील उलाढालीत घसरण

Patil_p

मारूतीच्या कार उत्पादनात 26 टक्के वाढ

Patil_p

कोविड काळातही एफपीआयचा भारतीय बाजारावर विश्वास

Patil_p

अक्षम्य ढिलाईचे शिकार

Patil_p

ब्लॅकस्टोनकडून एम्बसीची खरेदी

Patil_p

टाटा पॉवरला मिळाला मोठा प्रकल्प

Amit Kulkarni
error: Content is protected !!