तरुण भारत

सांगली जिल्ह्यात नवे ५७३ रूग्ण तर ४३९ कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सांगली

मंगळवारी जिल्हय़ात नवीन 573 रूग्ण वाढले आहेत. तर तब्बल 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 23 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 20 आणि परजिल्हय़ातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 703 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला  गृह अलगीकरण करून घेतले आहे. तसेच ज्या ज्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला आहे. त्यांनी त्यांची तपासणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

Advertisements

महापालिका क्षेत्रात 244 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन 244 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 159 तर मिरज शहरात 85 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर साडे चौदा हजारापेक्षा अधिक रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. सांगली  महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या आठ हजार 878 झाली आहे.

ग्रामीण भागात 329 रूग्ण वाढले

 ग्रामीण भागातही कोरोनाने गेल्या काही दिवसापासून हाहाकार सुरूच ठेवला आहे. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे.  नवीन 329 रूग्ण  आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 30, जत तालुक्यात 10, कडेगाव तालुक्यात 35 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात पाच, खानापूर तालुक्यात 57, मिरज तालुक्यात 52 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 30, शिराळा तालुक्यात 20, तासगाव तालुक्यात 23 आणि वाळवा तालुक्यात 67 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील 20 जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 20 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये  सांगली शहरातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 75 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालय येथे तर 91 वर्षीय व्यक्तीचा दुदनकर हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला.   मिरज शहरात चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा आणि 93 वर्षीय  महिलेचा वानलेस रूग्णालय येथे मृत्यू झाला. तर  40 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे आणि 48 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.  कुपवाड येथील 55 वर्षीय व्यक्तीचा क्रांती कॉर्डिक येथे मृत्यू झाला. बहे येथील 80 वर्षीय महिलेचा आधार हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला. शिरढोण येथील 54 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू  झाला. मानमोडी येथील 88 वर्षीय व्यक्तीचा सांगली हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाटेगाव येथील 67 वर्षीय क्रीटीकेअर आष्टा येथे मृत्यू झाला. लेंगरेवाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीचा श्रीसेवा हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. नागाव-निमणी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. कुंडल येथील 66 वर्षीय महिलेचा, कवठेमहांकाळ येथील 83 वर्षीय महिलेचा आणि रेठरेधरण येथील 50 वर्षीय महिलेचा  ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला.  कवठेमहांकाळ येथील 75 वर्षीय महिलेचा, बांबवडे येथील 70 वर्षीय व्यक्तीचा, आसद येथील 55 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर आष्टा येथील 79 वर्षीय महिलेचा स्पंदन हॉस्पिटल आष्टा येथे मृत्यू झाला.  या 20 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 703 झाली आहे.

परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू

 परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया तिघांचा मृत्यू झाला आहे.  कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 58 वर्षीय व्यक्तीचा शिरोळ येथील 82 वर्षीय व्यक्तीचा आणि सांगोला येथील 55 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 126 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

439 जण कोरोनामुक्त

जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही आता चांगलीच वाढत चालली आहे. मंगळवारी 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील नऊ हजार 917 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    18281

बरे झालेले     9917

उपचारात      7661

मयत          703

Related Stories

सांगली जिल्हय़ात आज कोरोनाचे चार बळी, नवे 95 रूग्ण

Abhijeet Shinde

ट्रॅक्टरखाली सापडून ऊसतोड मजुराचा मुलगा ठार

Abhijeet Shinde

मला गवत म्हणणारे पावसाळ्यातील छत्री : पडळकर

Abhijeet Shinde

मिरज-बेडग रोडवरील कचरा डेपोस आग, परीसरात धुराचे लोट

Abhijeet Shinde

शिराळा पोलिस स्टेशनने पटकावला देशात सातवा क्रमांक

Sumit Tambekar

सांगली : कारागृहात उद्रेक, 62 कैदी पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!