तरुण भारत

दोन खलिस्तानवाद्यांची संपत्ती होणार जप्त

एनआयए करणार कारवाई, शीख फॉर जस्टीस या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

अमेरिकास्थित शीख फॉर जस्टीस व कॅनडास्थित खलिस्तान टायगर फोर्स या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असलेल्या दोघा खलिस्तानवाद्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. गुरपतवंत सिंग पन्नून आणि हरदीप सिंग निज्जर अशी या दोन खलिस्तानवाद्यांची नावे आहेत. ही कारवाई राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे.

एनआयएच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या खलिस्तानवाद्यांवर अन लॉफुल ऍक्टीव्हीटिज प्रिव्हेंटेशन (युएपीए) या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. पन्नून याची अमृतसर येथील आणि जालंदर येथील निज्जर याची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जुलै महिन्यात युएपीएअंतर्गत त्यांना दहशतवादी घोषित केले होते. एसएफजे आणि खलिस्तान टायगर फोर्स या दोन्हीही खलिस्तानवादी संघटना आहेत.

Related Stories

अजमल यांनी फेकला ‘गमोसा’

Amit Kulkarni

नियम पाळल्यास लॉकडाऊनची गरजच नाही !

Patil_p

पंजाब : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून परतलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

datta jadhav

कोरोना रूग्णांची संख्या 30 लाखांवर

Patil_p

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

datta jadhav

ओवैसी अन् केसीआर यांच्याकडून घुसखोरांची होतेय पाठराखण

Omkar B
error: Content is protected !!