तरुण भारत

टेनिस स्पर्धेतून बार्टीची माघार

वृत्तसंस्था/ सिडनी

पॅरीसमध्ये 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेती ऍश्ले बार्टीने कोरोनाच्या भीतीमुळे माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने गेल्यावर्षी पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविले होते. बार्टीचे हे पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. कोरोना महामारीपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे हे माझे पहिले ध्येय आहे. तसेच या स्पर्धेसाठी मी टेनिसचा सराव करू शकले नाही, असे बार्टीने सांगितले. या दोन कारणामुळे आपण प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून माघार घेतली असून स्पर्धा आयोजकांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. ती सध्या आपल्या प्रशिक्षकासमवेत मेलबोर्नमध्ये राहत आहे. ऑस्ट्रेलियात पुन्हा कोरोनाची लाट दुसऱयांदा सुरू असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून ब्रिस्बेनऐवजी मेलबोर्नमध्ये वास्तव्य करण्याचा निर्णय घेतल्याचे बार्टीने सांगितले.

Related Stories

अफगाण क्रिकेट संघ बांगलादेशमध्ये दाखल

Patil_p

उमर अकमलच्या बंदीत कपात

Patil_p

प्रो हॉकी लीगचे दोन सामने लांबणीवर

Patil_p

उरुग्वेचा बोलिव्हियावर विजय, पराग्वेही विजयी

Amit Kulkarni

विंडीजविरुद्ध टी-20 साठी हॅरी ब्रूकचा इंग्लिश संघात समावेश

Patil_p

सर्बियाचा जोकोविच उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!