तरुण भारत

अपहरण केलेल्या ‘त्या’ पाच तरुणांना चीन करणार भारताच्या हवाली

ऑनलाईन टीम / इटानगर : 

अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या 5 तरुणांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याचे उघड झाले आहे. या तरुणांना चीन लवकरच भारताच्या हवाली करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली आहे. 

Advertisements

तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी अपहरण झालेल्या नागरिकांची नावे आहेत. हे पाचही लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. 

बेपत्ता तरुणांबाबत भारताने चीनकडे विचारणा केली होती. त्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या संदेशाला हॉटलाइनवर प्रतिसाद देऊन हे पाच तरुण त्यांच्या भागात आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. लवकरच चीन या तरुणांना भारताच्या हवाली करणार आहे.

Related Stories

मध्य प्रदेश : शिवराज सरकारकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात 137.66 कोटी रुपये

Rohan_P

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू सोलो नक्वेनी याला कारोनाची बाधा

Rohan_P

देशात 47,905 नवे कोरोना रुग्ण; 550 मृत्यू 

Rohan_P

विजयाच्या स्थितीत नाही काँग्रेस पक्ष : गुलाम नबी आझाद

Amit Kulkarni

मुख्यमंत्री बोम्माई केंद्रीय जलमंत्र्यांसोबत मेकेदातू , कृष्णा प्रकल्प प्रकरणावर करणार चर्चा

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली कोविड आढावा बैठक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!