तरुण भारत

सॅमसंगचे नवे फ्रिज दाखल

मुंबई

 विविध उत्पादने तयार करणाऱया सॅमसंगने आपल्या चार नव्या फ्रीजना भारतीय बाजारात नुकतेच सादर केले आहे. कर्ड मास्ट्रो लाईनअपअंतर्गत मोठय़ा क्षमतेचे फ्रिज सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत.

कर्ड मास्ट्रो लाइनअपअंतर्गत 386 लिटर आणि 407 लिटर क्षमतेचे फ्रिज कंपनीने आणले आहेत. याआधी कंपनीने 244, 265, 314 व 336 लिटर क्षमतेचे फ्रिज बाजारात दाखल केले होते. 386 लिटरच्या नव्या फ्रिजची किंमत ( टू स्टार) 55 हजार 990 रुपये तर थ्री स्टारची किंमत 56 हजार 990 रुपये असणार आहे. दुसरीकडे 407 लिटरच्या फ्रिजची किंमत (टू स्टार) 61 हजार 990 रुपये आणि थ्री स्टारची किंमत 63 हजार 990 रुपये इतकी असेल. लवकरात लवकर ऑर्डर नोंदवणाऱया ग्राहकांना कंपनीकडून 15 टक्के कॅशबॅक ऑफर जाहीर करण्यात आली असून 990 रुपयांच्या कमीत कमी इएमआयवर ग्राहकांना फ्रिज खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Related Stories

टीसीएस कर्मचाऱयांचे वाढवणार वेतन

Patil_p

एसबीआय बिगर बँकिंग कंपन्यांच्या मदतीने एमएसएमईला देणार कर्ज?

Omkar B

वैयक्तिक कर्जासाठी नियम कडक

Patil_p

शाओमीचा इलेक्ट्रिक एअर कॉम्प्रेसर बाजारात

Patil_p

मल्टीनॅशनल कंपन्यांनी केले फेसबुक -इंस्टाग्रामला अनफ्रेंड !

Patil_p

ऍमेझॉनची आयआरसीटीसीसोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!