तरुण भारत

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

मुंबई

 चिनी कंपनी शाओमी एमआय इंडिया यांनी आपला नवा स्मार्ट बँड भारतीय बाजारात उतरवला आहे. मे 2020 मध्ये कंपनीने आपल्या विविध उत्पादनांना भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे स्मार्ट बँड उत्पादन भारतीयांच्या हाती देताना आनंद होत असल्याचे मुख्य व्यवसाय अधिकारी रघु रेड्डी यांनी सांगितले. हा नवा फिटनेस बँड कंपनीने नुकताच लाँच केला असून 2.7 सेंटीमीटरच्या बँडला रंगीत एलसीडी टच डिस्प्ले आहे. स्मार्ट वॉचला यूएसबीचा आधारही असून 14 दिवसापर्यंत बॅटरी कार्यरत राहते, असा कंपनीचा दावा आहे. त्याचप्रमाणे दोन तासात बॅटरी 100 टक्के चार्ज होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. काळा, हिरवा, निळा आणि नारंगी रंगांमध्ये स्मार्ट बँड उपलब्ध आहे. पळणे, नुसते चालणे, सायकलिंग याशिवाय इतर साधे व्यायाम करताना याचा वापर केल्यास हृदयांच्या ठोक्मयांवर लक्ष ठेवण्यासह इतर बाबींची माहिती कळते.

Related Stories

उत्पादीत देशाची माहिती द्या- केट

Patil_p

चालू वर्षात जीडीपी 3.1 टक्क्मयांनी घटण्याचे संकेत

Patil_p

फेसबुकची ऑनलाईन शॉपिंगची सुविधा

Patil_p

पेटीएमचा वित्त वर्ष 2020 मध्ये महसूल वाढून 3,629 कोटीच्या घरात

omkar B

रिलायन्सचे बाजारमूल्य 14 लाख कोटींवर

Patil_p

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम !

Patil_p
error: Content is protected !!