तरुण भारत

वडगाव येथे विणकराची आत्महत्या

भाडय़ाच्या घराच्या टेरेसवर घेतला गळफास

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

देवांगनगर, वडगाव येथील एका विणकर कामगाराने आपण राहत असलेल्या भाडय़ाच्या घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

उमेश ईरसंगाप्पा कोलार (वय 36, रा. देवांगनगर, वडगाव) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मंगळवारी 8 सप्टेब्ंर रोजी दुपारी 3.30 ते 4.30 यावेळेत दोन पाण्याच्या टाक्यांच्या मध्ये असलेल्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

उपलब्ध माहितीनुसार उमेश याला दारुचे व्यसन जडले होते. त्यामुळे तो व्यवस्थीत कामावरही जात नव्हता. कुटुंबियांनी दारु पिवू नकोस. कामावर जा, असे सांगितल्याने मनस्ताप होवून त्याने आत्महत्या केली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

गणेशमुर्ती हौदात विसर्जन करून अपमान थांबावावे

Amit Kulkarni

बिम्स हॉस्टेलच्या डेनेजचे पाणी अनेकांच्या घरात

Amit Kulkarni

गुरुवारपेठ टिळकवाडी येथे रस्त्यावर टाकला जातोय कचरा

Amit Kulkarni

श्रमदानातून शिक्षकांनी बुजविले खड्डे

Patil_p

हुक्केरीत पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान

Omkar B

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मनोज देसाईला सुवर्णपदक

Amit Kulkarni
error: Content is protected !!