तरुण भारत

कोरोना संसर्ग : फुफ्फुस अन् हृदय 3 महिन्यात आपोआप

दिलासादायक वृत्त : ऑस्ट्रियाच्या संशोधकांचा दावा

कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यावर रुग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत फुफ्फुस आणि हृदय डॅमेज राहण्याचा धोका व्यक्त करण्यात आला होता. परंतु नवे संशोधन यासंबंधीची भीती कमी करणार आहे. संसर्ग संपुष्टात आल्यावर 3 महिन्यांनी फुफ्फुस आणि हृदय स्वतःच दुरुस्त होण्यास प्रारंभ करू लागते असे ऑस्ट्रियाच्या संशोधकांचे म्हणणे आहे. 29 एप्रिलपासून 9 जूनदरम्यान कोरोनाच्या 86 बाधितांवर झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. हे संशोधन युरोपियन रेस्पिरेट्री सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

Advertisements

4 मुद्यांमधून जाणून घ्या संशोधन

1. रुग्णांना तीनदा तपासणीसाठी बोलाविले

कोरोना रुग्णांना उपचारानंतर 6 व्या, 12 व्या आणि 24 व्या आठवडय़ात पुन्हा तपासणीसाठी बेलाविण्यात आले होते. तपासणीदरम्यान अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. फुफ्फुसांची तपासणी करण्यात आली, रक्तातील ऑक्सिजन आणि कर्बवायूची पातळी पाहण्यात आली.

2. पहिल्या तपासणीत फुफ्फुस आढळले होते डॅमेज

पहिल्यांदा तपासणीसाठी बोलाविण्यात आले असता 50 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये कुठली ना कुठली एक समस्या निश्चित होती. यात श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला इत्यादींचा समावेश होता. सीटी स्कॅन करून पाहिले असता 88 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना डॅमेज झाल्याचे आढळून आल्याचे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

3. दुसऱया तपासणीत 56 टक्क्यांपर्यंत सुधारणा

डिस्चार्ज झाल्याच्या 12 व्या आठवडय़ात होणाऱया तपासणीत सुधारणा दिसून आली आहे. रुग्णांची फुफ्फुसे 56 टक्क्यांपर्यंत रिपेयर (दुरुस्त) झाली होती. यात 65 टक्के रुग्णांना पहिल्या तपासणीवेळी श्वास घेताना त्रास होण्यासह खोकल्याची समस्या होती. रुग्णांच्या या लक्षणांमध्येही सुधारणा दिसून आली आहे. 24 व्या आठवडय़ात झालेल्या तपासणीत मोठय़ा प्रमाणात डॅमेज भरून निघाले आहे.

4. हृदयाचा एक हिस्साही डॅमेज

कोरोनाच्या विरोधात लढल्यावर रुग्णांची फुफ्फुसं डॅमेज होत असली तरीही काळासोबत ती स्वतःच दुरुस्त होत आहेत असे उद्गार संशोधक डॉ. सबीना शाहनिक यांनी काढले आहेत. 6 व्या आठवडय़ात झालेल्या तपासणीत 58 टक्के रुग्णांच्या हृदयाचा डावा वेंट्रिकल योग्यप्रकारे काम करत नव्हता. यात डॅमेज, रक्ताच्या गुठळय़ा आणि सूज होती. काही काळानंतर झालेल्या तपासणीत यात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे दिसून आले आहे.

पाकिस्तान : 426 नवे रुग्ण

पाकिस्तानात दिवसभरात 426 नवे रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 2,99,659 झाली आहे. दिवसभरात 9 बाधितांना जीव गमवावा लागल्याने बळींचे प्रमाण वाढून 6,359 वर पोहोचले आहे. तर 544 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. देशात आतापर्यंत 2,86,509 रुग्णांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. पाकिस्तानात सिंध प्रांतात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सिंधनंतर पंजाबमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झाला आहे.

फ्रान्स : पंतप्रधानांना दिलासा

टू डे फ्रान्सच्या बॉसच्या संपर्कात राहिल्यावर फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी कोविड-19 ची चाचणी करविली आहे. सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आाल आहे. पंतप्रधानांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाहीत असे कॅस्टेक्स यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान खबरदारीच्या स्वरुपात शारीरीक अंतर राखणार आहेत. कॅस्टेक्स यांनी टू डे फ्रान्सचे संचालक क्रिश्चियन प्रूधोमे यांच्यासोबत कारमधून प्रवास केला होता. प्रूधोमे हे त्यानंतर कोरोनाबाधित आढळून आले होते.

इंग्लंड : नवा निर्बंध

ब्रिटन सरकारने इंग्लंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने नियम कठोर केले आहेत. तेथे आता 6 जणांना एकत्र येता येणार नसल्याची माहिती पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. इंग्लंडमध्ये मागील 3 दिवसांमध्ये 8500 नवे रुग्ण सापडल्याने कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेचा धोका वाढत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 3.52 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर 41,586 जणांना जीव गमवावा लागला आहे.

ब्राझील : 504 बळी

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 504 जण दगावले असून 14 हजार 279 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचा आकडा 41 लाख 65 हजार 124 वर पोहोचला आहे. तर मृतांचे प्रमाण 1 लाख 27 हजार 517 झाले आहे. ब्राझीलमध्ये साओ पाऊलो प्रांतात सर्वाधिक 8.58 लाख रुग्ण आढळले आहेत. तर रियो डि जेनेरियो प्रांतात 2.33 लाख रुग्णांची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलियात रुग्ण वाढतेच

ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरलेल्या व्हिक्टोरिया प्रांतात दिवसभरात 76 नवे रुग्ण सापडले असून 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. व्हिक्टोरिया देशातील दुसऱया क्रमांकाची लोकसंख्या असलेला प्रांत आहे. एक दिवसापूर्वी तेथे 55 रुग्ण आढळले आणि 8 जण दगावले होते. तेथील मेलबर्न शहरात 28 सप्टेंबरपर्यंत ये-जा करण्यास मनाई असून मोठय़ा स्तरावर ट्रेसिंग केले जात आहे.

इजिप्त : 187 नवे रुग्ण

इजिप्तमध्ये दिवसभरात 187 नवे बाधित सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 1,00,228 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू ओढवल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील बळींचे प्रमाण आता 5,560 झाले आहे. मागील 24 तासांत 878 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आतायर्पंत 79,886 रुग्ण बरे झाले आहेत.

व्हेनेझुएला : चाचणी लवकरच

व्हेनेझुएलात रशियाच्या स्पुतनिक-5 या लसीची चालू महिन्यातच चाचणी सुरू होणर असल्याचे विधान अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी केले आहे. स्पुतनिक-5 लस रशियाच्या गामलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमियोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने मिळून तयार केली आहे. रशिया सध्या 5 देशांसोबत मिळून लसीचे उत्पादन करत आहे. व्हेनेझुएलात आतापर्यंत 54 हजार 350 रुग्ण सापडले असून 436 जणांचा मृत्यू झाला आहे.

इराण : शाळा सुरू

इराणमध्ये सुमारे 7 महिन्यांनी शाळा सुरू झाल्या आहेत. देशातील 1.5 कोटी मुलांपैकी बहुतांश जण शाळेत परतले असले तरीही संसर्ग कमी असलेल्या ठिकाणीच हे शक्य झाले आहे. शाळेत परतल्यावर मुलांना ‘कैद’ होऊन शिकावे लागत आहे. काही शाळांमध्ये कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मुलांना विशेष स्वरुपात तयार करण्यात आलेल्या जाळय़ात बसावे लागत आहे. प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र जाळय़ाचा कक्ष आहे. इराणच्या रेड झोनमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने शाळा बंद आहेत.

Related Stories

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटींवर

datta jadhav

ट्रम्प यांच्या विदेश धोरणाला आणखी एक यश

Patil_p

इंडोनेशियात चीनची लस

Patil_p

चॅपर विषाणूने भीती वाढविली

Omkar B

लक्षणरहित संसर्ग रोखण्यासही प्रभावी : लॅन्सेट नियतकालिकात अहवाल प्रकाशित

Omkar B

डोंगराळ भागातील लढाईसाठी भारताकडे सर्वात मोठी आणि अनुभवी सेना; चिनी लष्करी तज्ज्ञांचा दावा

Rohan_P
error: Content is protected !!