तरुण भारत

श्रीलंकेत गोहत्येवर बंदी घालण्याची तयारी

कोलंबो

 श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या सरकारने देशात गोहत्येवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजपक्षे यांनी स्वतःच्या सत्तारुढ श्रीलंका पोडुजना पेरुमना या पक्षाच्या संसदीय समितीला गोहत्येवर बंदी घालणारे विधेयक लवकरच मांडले जाणार असल्याचे कळविले आहे. परंतु देशात गोमांस सेवनावर बंदी नसणार आहे. गोमांसाची आयात करता येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. बुद्ध शासन, धार्मिक आणि सांस्कृतिक विभाग राजपक्षे यांच्याकडेच आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव कधी मांडणार हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. श्रीलंकेत बौद्धधर्मीयांचे प्रमाण अधिक आहे. देशातील बहुतांश लोक मांसाहारी आहेत. परंतु हिंदू आणि बुद्ध धर्म मानणारे गोमांस खात नाहीत. गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी बौद्ध समुदाय दीर्घकाळापासून करत होता.

Advertisements

Related Stories

चीनच्या दादागिरीला मलेशियाचे आव्हान

Patil_p

पुतीन यांचे विरोधी पक्षनेते अलेस्की नवाल्नी व्हेंटिलेटरवर

Rohan_P

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला; 2 ठार

datta jadhav

देशव्यापी आंदोलन घडविल्याप्रकरणी इराणच्या पत्रकारास फाशी

datta jadhav

तैवानच्या मंत्र्याचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

Patil_p

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav
error: Content is protected !!