तरुण भारत

नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकन

इस्रायल-युएई शांतता करारात महत्त्वाचे योगदान

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात आले आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात ऐतिहासिक शांती करार घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांचे नाव नॉर्वेच्या संसदेने पुरस्कारासाठी सुचविले आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतरच इस्रायल आणि युएईने करारावर स्वाक्षरी केली होती. करारामुळे 72 वर्षांनी दोन्ही देशांमधील संघर्ष संपुष्टात आला होता. मागील महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू, अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायद आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. हे ऐतिहासिक कूटनीतिक यश मध्यपूर्व क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

Related Stories

अमेरिकेच्या सीमेवर ४ भारतीयांचा मृत्यू

Abhijeet Shinde

तालिबानला पंजशीर ताब्यात घेण्यास मदत केली नाही, पाकिस्तानने दावा फेटाळला

Abhijeet Shinde

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी गाठला 55 लाखाचा टप्पा

datta jadhav

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा मृत्यू

Patil_p

भारताच्या विजयामुळे चीनचा जळफळाट

Patil_p

इटलीतील ज्वालामुखी पर्वत होतोय उंच

Amit Kulkarni
error: Content is protected !!