तरुण भारत

मेस्सी बार्सिलोनाच्या सरावात दाखल

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

लायोनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार असल्याची चर्चा बरीच रंगली होती. पण  आता त्याने बुधवारपासून संघसहकाऱयांसमवेत सरावालाही सुरुवात केली आहे.

Advertisements

सोमवारी क्लबमध्ये आल्यापासून तो स्वतंत्रपणे सराव करीत होता. आपल्याला क्लब सोडण्याची इच्छा असल्याचे त्याने जाहीर केल्यापासून व नंतर कायदेशीर वाद टाळण्यासाठी क्लबमध्येच राहण्याचे ठरविल्यापासून तो संघात सामील झाला नव्हता. बार्सिलोनाचे नवे प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा सराव सुरू होता. पण त्यात सामील होण्याआधी मेस्सीला दोनदा कोरोना चाचणी करावी लागली. त्यात पास झाल्यानंतर तो सरावासाठी संघात सामील झाला आहे.   मेस्सीप्रमाणेच फिलिप कुटिन्होही संघात सामील झाला आहे. तो देखील स्वतंत्रपणे सराव करीत होता.

Related Stories

मुंबई इंडियन्स-आरसीबी आज आमनेसामने

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात 15 वर्षांनंतर पहिलीच कसोटी

Patil_p

बेंगळूर युनायटेडची मोहम्मेडनवर मात

Patil_p

क्रिकेटपटू तन्मय श्रीवास्तव निवृत्त

Patil_p

सिलीकचा पहिल्या फेरीत पराभव

Patil_p

भारताच्या आगामी दौऱयाला ऑस्ट्रेलिया शासनाकडून हिरवा कंदील?

Patil_p
error: Content is protected !!