तरुण भारत

धोका वाढला : उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांनी पार केला 27 हजारांचा टप्पा

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 1,061 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. या सोबतच कोरोना रुग्णांनी 27 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 हजार 211 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल 9,164 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 1,061 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 35 , बागेश्र्वर 0, चमोली 32, चंपावत 51, देहरादून 251, हरिद्वार 142, नैनिताल 36, पौरी गरवाल 68, पिथोरगड 27, रुद्र प्रयाग 49,तेहरी गरवाल 82, यू एस नगरमधील 265 आणि उत्तर काशीमधील 23 जणांचा समावेश आहे. 

  • मृतांची संख्या 8,500 

प्रदेशात आतापर्यंत 18,262 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.11 टक्के इतके आहे. तर सध्या 8 हजार 500 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

मोरॅटोरियमवरून चपराक

Patil_p

दिल्लीत पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत झाला घटस्फोटाचा निर्णय

pradnya p

दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करा

Patil_p

आजोबांच्या मृतदेहावर नातवाचा आक्रोश…

Patil_p

प्रतिबंधासाठी शिकस्त

tarunbharat

काँगेसमध्ये मतभेदांना आणखी ऊत

Patil_p
error: Content is protected !!