तरुण भारत

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 2,137 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2 हजार 137 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 69 हजार 684 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Advertisements

  
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 69,684 रुग्णांपैकी 50 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 061 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 17,065 रुग्णांवर उपचार सुरू 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 12 लाख 69 हजार 052 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 17 हजार 065 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 573 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 74 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

  • शहर   एकूण रुग्ण संख्या 
  • लुधियाना  12,752
  • जालंधर    8,564
  • पटियाला   7585
  • अमृतसर   5530
  • सास नगर  5239

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

Rohan_P

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे ‘कॅप्टन’

Patil_p

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील 730 डॉक्टरांचा मृत्यू

Rohan_P

जम्मू हवाई तळावरील हल्ल्याचा तपास NIA कडे

datta jadhav

आणखी 47 चिनी ऍप्सवर बंदी

Patil_p

अखेर समीर वानखेडेंची बदली

datta jadhav
error: Content is protected !!