तरुण भारत

सातारा नगरपालिका आणि झेडपी कोरोनाच्या विळख्यात

जिल्हा परिषदेत एनआरएचएम आणि अर्थ विभागात आढळून आले पॉझिटिव्ह, नगरपालिकेत जन्म मृत्यू विभागात एक बाधित आढळून आल्याने विभागाला टाळा, पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातले अजून ही कोरोनटाइनमध्ये

सातारा / प्रतिनिधी
सातारा शहरात असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका या कार्यालयात काल आणखीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेत अर्थ आणि एनआरएचएम विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगरपालिकेत आज जन्म मृत्यू विभागात एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आली असून त्यामुळे तो विभाग बंद करण्यात आला आहे. अजूनही पालिकेतील पाणी पुरवठा विभागतले क्वारंटाइनमध्ये कार्यरत आहेत.

सातारा जिल्हा परिषदेत अर्थ विभागातले मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यभार पहात असलेल्या महिला अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याकडे कोरोनाचे कामकाज होते. तर एन.आर.एच.एम.विभागात असलेल्या महिला कर्मचारी सोशल डिस्टंनसिंगचे पालन करत नव्हत्या त्यामुळे त्या बाधित आढळून आल्या.

Advertisements

सातारा पालिकेत गुरुवारी सकाळी बातमी धडकली ती म्हणजे पालिकेतल्या जन्म मृत्यू विभागात एक महिला कर्मचारी बाधित झाल्याचे लगेच या विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. विद्युत विभागात ही एक कर्मचारी बाधित आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागात आढळून आलेले कोरोना बाधित अजून उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिका या दोन्ही कार्यालयात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असताना दिसत आहे.

Related Stories

उपनराध्यक्षपदी शेंडे की आंबेकर?

Patil_p

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

triratna

सातारा : लोणंद येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना चिरडले

Shankar_P

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

datta jadhav

लस घेतलेले शिक्षक घरातच

Patil_p

सातारा : वाई बाजार समितीवर शेतकऱ्यांचा मोर्चा

datta jadhav
error: Content is protected !!