तरुण भारत

कॅन्सरशी ‘गाठ’ आहे !

स्तनांमध्ये गाठ जाणवत असल्यास ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. हा कॅन्सरही असू शकतो. स्तन कॅन्सर हा महिलांतील सर्वांत सामान्यपणे दिसून येणारा कॅन्सर आहे. लवकर याचा शोध घेण्यासाठी स्तनांची नियमित तपासणी जरूरी आहे. स्तनांमध्ये अनेक गाठी हानिरहित फुग्यांप्रमाणे असतात. त्या द्रवाने भरलेल्या असतात, त्यास सिस्टस् असे म्हटले जाते; परंतु सर्व प्रकारच्या गाठींची डॉक्टरांकडून तपासणी करणे जरूरी आहे. जेणेकरून कॅन्सरची शंका दूर केली जाऊ शकेल.

  • निगेटिव्ह मॅमोग्राम (स्तनांचा विशेष एक्स-रे) रिपोर्ट आल्यानंतरही स्तनांत कॅन्सर होऊ शकतो. म्हणूनच प्रथम डॉक्टरांकडून मॅमोग्राम करावयास हवा. कुटुंबामध्ये एखादी महिला कधी स्तनांच्या कर्करोगाने ग्रस्त झाली असेल तर कुटुंबात दुसर्या महिलेत स्तन कॅन्सर होण्याचा धोका दोन ते तीन पटीने अधिक होतो.
  • चाळीस वर्षांपेक्षा अधिक वय, लठ्ठपणा, अधिक फॅटस्युक्त आहार, रेडिएशनच्या संपर्कात येणे, अधिक वयात माता बनणार्या महिला, अशा स्त्रियांना स्तन कॅन्सरचा धोका अधिक असतो.
  • स्तन कॅन्सरपासून बचावासाठी याचे वेळीच निदान हेणे महत्त्वपूर्ण आहे. यासाठी मासिकपाळी नंतरच्या आठवडय़ात स्तनांचे हातांनी स्वयं निरीक्षण करावे. स्तनांतील गाठ तपासली जाऊ शकते.
  • 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनी प्रत्येक वर्षी एक वेळा डॉक्टरांकडून स्तनांची तपासणी करवून घेतली पाहिजे.
  • 35-40 वर्षे वयातरम्यान एकदा बेसलाइन मॅमोग्राम करवून घ्यावे. 40 वर्षे वयानंतर दरवर्षी एक वेळा मॅमोग्राम केले पाहिजे.
  • पुरूषांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अत्यंत कमी असते. परंतु तरीही छातीतील गाठीकडे दुर्लक्ष करु नये.

– डॉ. प्राजक्ता पाटील

Related Stories

सांगली : लाडक्या आजीला झोपेतच मृत्यूने गाठले अन् नातवाचे काळीजच फाटले…

Shankar_P

योगा मेंदूसाठीही लाभदायक

omkar B

बॉटल एक्सरसाईज !

omkar B

उन्हाळ्यातील नेत्रदक्षता

tarunbharat

कर्करोग आणि कोरोना

omkar B

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav
error: Content is protected !!