तरुण भारत

डायव्हर्टिक्युलायटिस आणि पथ्याहार

व्यक्तीचे वय वाढले की आपल्या आतडय़ाच्या अंतःत्वचेला छोटे छोटे फोड येतात. यालाच डायव्हर्टिक्युला म्हणतात.

  • ह्या आजारात नॉशिया, उल्टी, ब्लॉटिंग, ताप येणे, पोटात वायू होणे किंवा जुलाब आदी लक्षणे दिसून येतात.
  • ज्यांच्या आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असते त्यांना हा त्रास अधिक प्रमाणात होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे.
  • डायव्हर्टिक्युलायटिसमध्ये त्रासदायक लक्षणे दिसत असतील तर उपचाराचा भाग म्हणून डॉक्टर सर्वसाधारणपणे लिक्विड डायव्हर्टिक्युलायटिस डाएट घेण्यास सुचवतात. यात पाणी, फळांचा रस, रसदार पदार्थ, फळांच्या रसांची कँडी  यांचा समावेश होतो.
  • असे आहारपथ्य पाळल्यानंतर काही काळाने रुग्णांना सामान्य आहार घेण्यास सांगतात.  तंतूमय पदार्थांचा समावेश असलेला आहार घेतल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते असे अभ्यासातूनही स्पष्ट झाले आहे.
  • 51 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलांनी प्रतिदिवस 25 ग्रम आणि त्यापेक्षा अधिक वयोमान असणार्या महिलांनी 21 ग्रम इतके तंतूमय पदार्थांचे सेवन केले पाहिजे. पुरुषांमध्ये 51 पेक्षा
  • कमी वयाच्या पुरुषांनी प्रतिदिन 38 ग्रम आणि त्यापेक्षा अधिक वय असणार्या पुरुषांनी 30ग्रम इतके तंतुमय पदार्थ आहारात समाविष्ट केले पाहिजेत.

तंतुमय पदार्थांसाठी काही साधे आहार पर्याय

  • आख्खे धान्य वापरुन केलेले ब्रेड, पास्ता आणि कडधान्ये
  • बीन्स म्हणजे राजमा, पावटा इ.
  • सफरचंदासारखी फळे
  • थोडक्यात हा त्रास असणार्या व्यक्तींना पचण्यास कठीण असलेले पदार्थ आहारातून वगळण्यास सांगितले जातात. ङकाही बियावर्गीय धान्ये, मका वर्ज्य करण्यास सांगितले जाते. कारण आतडय़ातील फोडांमध्ये हे पदार्थ अडकू शकतात. त्यामुळे आतडय़ाला सूज येऊ शकते असे सांगितले जात होते. मात्र नव्या संशोधनानुसार विविध प्रकारच्या बियांमध्ये तंतूमय पदार्थ असतात त्यामुळे डायव्हर्टिक्युलायटिस झालेल्या व्यक्ती बियावर्गीय धान्यांचे सेवन करु शकतात.

Related Stories

कुत्र्याच्या लाळेपासून जरा जपून

tarunbharat

नेब्युलायजरची संजीवनी

omkar B

व्याधी टॉन्सिल्सची

omkar B

मुलांमधील बध्दकोष्ठता

tarunbharat

नागीन आणि अ‍ॅलोपॅथी

omkar B

कर्करोग आणि कोरोना

omkar B
error: Content is protected !!