तरुण भारत

21 व्या शतकातील शालेय शिक्षण बैठकीत उद्या नरेंद्र मोदींचे भाषण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 (एनईपी – 2020) अंतर्गत ’21 व्या शतकातील शालेय शिक्षण’ बैठकीत 11 सप्टेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल.

Advertisements


शिक्षण मंत्रालयाच्या वतीने शिक्षक पर्वचा एक भाग म्हणून 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात येत आहे.
अलिकडेच 7 ऑगस्ट 2020 रोजी एनईपी – 2020 अंतर्गत `उच्च शिक्षणातील परिवर्तन सुधारणांवर परिषदे`च्या उद्घाटन समारंभाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते.
मोदी यांनी 7 सप्टेंबर रोजी एनईपी – 2020 वरील राज्यपालांच्या बैठकीलाही संबोधित केले होते.


एनईपी – 2020 हे  21 व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे जे या पूर्वीच्या 1986 मधील राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर 34 वर्षांनी घोषित करण्यात आले आहे. शाळा आणि उच्च शिक्षण स्तर अशा दोन्हीतील महत्त्वाच्या सुधारणांच्या दिशेने एनईपी – 2020 आहे. 
भारताला समान आणि उल्लेखनीय ज्ञानी समाज बनविण्याचे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. यात भारत – केंद्रित शिक्षण प्रणालीची कल्पना आहे जी भारताला जागतिक महासत्तेत रूपांतरित करण्यासाठी थेट हातभार लावेल .


एनईपी – 2020 ने देशातील शालेय शिक्षणामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा आणल्या आहेत. शालेय स्तरावर 8 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई) सार्वत्रिकीकरण करण्यावर भर दिला जात आहे; 10+2 रचनेचा शालेय अभ्यासक्रम आता 5+3+3+4 अशा अभ्यासक्रम रचनेत बदलण्यात आला आहे, त्याशिवाय यामध्ये 21 व्या शतकाच्या कौशल्यांमध्ये अभ्यासक्रम समाविष्ट करणे, गणितीय विचार आणि वैज्ञानिक स्वभाव, शालेय शिक्षणासाठी नवीन व्यापक राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रचना विकसित करणे, शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके, मूल्यांकन सुधारणा आणि बालकाचे सर्वंकष समग्र प्रगतीपुस्तक, आणि 6 व्या वर्गापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश असेल.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 पुढे नेण्यासाठी आणि शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी 8 सप्टेंबर – 25 सप्टेंबर 2020 या काळात शिक्षक पर्व साजरे केले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 विषयी संपूर्ण देशभरात वैविध्यपूर्ण विषयांवर अनेकविध वेबिनार, व्हर्च्युअल परिषदा, आणि बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.

Related Stories

हिमाचल प्रदेश : क्वारंटाइन केंद्र आणि आंतरराज्यीय सीमांवर आता शिक्षकांची नियुक्ती 

Rohan_P

तामिळनाडूत ‘100 टक्के सिद्ध’ उपचाराचा दावा

Patil_p

राजौरीत 1800 बंकर्सची निर्मिती

Patil_p

भारताचा खलिस्तानी नकाशा जारी

datta jadhav

‘या’ राज्यात दहावीची परीक्षा रद्द

Rohan_P

देशव्यापी निर्बंधांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!