तरुण भारत

बसुर्ते येथील जमीन केली दुसऱयाच्या नावावर

प्रतिनिधी /बेळगाव :

बसुर्तेमधील एका शेतकऱयाची जमीन दुसऱयाच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे जमीन दुसऱयाच्या नावावर करण्यासाठी उचगावचे तलाठी आणि सर्कल यांनी बेकायदेशीररित्या मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. तेंव्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी उचगाव येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Advertisements

बसुर्ते येथील यल्लाप्पा परशुराम नाईक आणि उमेश परशुराम नाईक यांची जमीन विठ्ठल गुमटे यांच्या नावावर केली आहे. उचगावचे तलाठी विजय कोष्टी आणि सर्कल वेंकटेश धापळे यांनी ही करामत केली आहे. अशा प्रकारे जर शेतकऱयांच्या जमीनी दुसऱयांच्या नावावर हे अधिकारी करत असतील तर शेतकऱयांनी कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न करण्यात आला आहे.

बेकायदेशीररित्या तलाठी आणि सरकार यांनी हे काम केले आहे. तेंव्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तब्बल 10 एकर जमीन दुसऱयांच्या नावावर केल्याने उचगाव परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे अनेक उताऱयांमध्ये फेरफार केली असून हे तलाठी आणि सर्कल उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तेंव्हा त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. बी. के. हंजी, मंजुनाथ कांबळे, महादेव पाटील, कृष्णा नाईक, यल्लाप्पा परशराम नाईक, सागर नाईक, बाळू भोगण यांच्यासह मोठय़ा संख्येन शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

पर्यावरणाचा ऱहास भविष्यासाठी धोकादायक

Patil_p

बेळगावात आयकर विभाग मुख्य आयुक्तांची नियुक्ती करा

Patil_p

सर्वात प्रथम चाखला बेळगावकरांनी हापूस

Patil_p

नदीकाठावरील नागरिकांना जिल्हाधिकाऱयांचे सतर्कतेचे आवाहन

Omkar B

मराठा जागृती निर्माण संघातर्फे पालकांचा सत्कार

Patil_p

पुष्पमाला गायकवाड यांच्याकडून लोकमान्य ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!