तरुण भारत

हुवाईचा मॅटपॅड टॅब्लेट बाजारात

नवी दिल्ली : हुवाई या कंपनीने आपला नवा मॅटपॅड टी 8 टॅब्लेट नुकताच भारतीय बाजारात उतरवला आहे. याची किंमत 9 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. ग्राहकांना 8 सप्टेंबरपासून 14 सप्टेंबरपर्यंत प्री बुकिंग करता येणार आहे. एलटीई व्हर्जनच्या टॅब्लेटची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. प्री ऑर्डर करणाऱया ग्राहकांना रोख सवलत 999 रुपयांची मिळवता येणार आहे. हा टॅब्लेट इएमयुआय 10 वर चालत असून यावर 4 प्री इंस्टॉल्ड ऍप्स रेकॉर्डर, कॅमरा, मल्टिमीडिया आणि किडस् पॅरेंटींगची सुविधा आहे. 5 हजार 100 एमएएचची बॅटरी यात आहे.

पॉवर ग्रिडला संपत्ती विकण्यास परवानगी

Advertisements

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला आपल्या सहकारी कंपन्यांच्या संपत्तीबाबत व्यवहार करण्याची अनुमती मिळाली आहे. त्यामुळे पॉवर ग्रिडचा आता संपत्ती विकता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या करीता कंपनीला हिरवा कंदील दाखवला आहे. याअंतर्गत कंपनीला 7 हजार कोटी रुपये मिळण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या रक्कमेचा वापर कंपनी आपल्या नव्या प्रकल्पांसाठी करणार असल्याचे सांगण्यात येते. उच्च क्षमतेच्या ट्रान्स्मीशन लाइन्स आणि सब-स्टेशनचे कामही प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे.

पेटीएमचे उत्पन्न 3 हजार कोटी रुपयांवर

नवी दिल्ली : पैशाच्या देवाणघेवाणीच्या डिजिटल व्यवहारात सेवा देणाऱया पेटीएमचे 31 मार्चला संपलेल्या 2019-20 आर्थिक वर्षादरम्यान उत्पन्न वाढून 3 हजार 629 कोटी रुपयांवर पोहचले आहे. कंपनीने सांगितले की वर्षागणिक आधारावर पाहता तोटा 40 टक्के इतका कमी झाला आहे. बाजारातील व्यापाऱयांकरीता कंपनी उत्तम डिजिटल सेवा देण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. डिजिटल देवाणघेवाण व्यवहारात अलीकडे वाढ झाली असून उपकरणांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागच्या वर्षाच्या तुलनेत कंपनीचा तोटा 40 टक्क्यांनी घटला आहे. 2022 पर्यंत कंपनीला नफ्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान छोटेमोठे व्यावसायिक, किराणा दुकानदार आदींकडून अँड्रॉइड आधारीत पॉइंट ऑफ सेलच्या मागणीत झपाटय़ाने वाढ होत असून अशा 2 लाख उपकरणांची विक्री कंपनीने केली आहे.

Related Stories

गोल्ड म्युच्युअल फंडकडून 13 टक्क्यांचा परतावा

Patil_p

फोर्डने वाढवल्या कार्सच्या किमती

Patil_p

तिमाहीत कर्जाचा वेग संथ तर ठेवींमध्ये तेजी

Patil_p

राधे डेव्हलपर्सच्या समभागाने दिला उत्तम परतावा

Patil_p

आगामी सहा महिने बँकांचा संप नाही?

Patil_p

मेड इन इंडिया व्हिडीयो ऍप सादर

Patil_p
error: Content is protected !!