22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

दिल्लीत 4308 नवे कोरोना रुग्ण, 28 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 4308 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 05 हजार 482 वर पोहचली आहे. यामधील 25,416 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 2637 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 75 हजार 400 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4666 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 19 लाख 62 हजार 120 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 9004 आरटीपीसीआर टेस्ट आणि 49,336 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 7.38 % आहे. तर 1272 झोन आणि 207 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

देशात बाधितांची संख्या 8447

Patil_p

उत्तर प्रदेशात 16 ते 31 जुलैपर्यंत लागू नसणार संपूर्ण लॉक डाऊन

pradnya p

काश्मिरात सीमेनजीक ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट

Patil_p

सौरव गांगुलीकडून गरजूंना 50 लाख रुपयांचे तांदूळ

tarunbharat

कर्तव्यपूर्तीच्या भावनेला सलाम

Patil_p

150 देशांचा जीडीपी ‘आत्मनिर्भर’ पॅकेजपेक्षा कमी

Patil_p
error: Content is protected !!