तरुण भारत

बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणाली…

ऑनलाईन टीम /  मुंबई : 


अभिनेत्री कंगना आणि शिवसेनेतील वाद आता वाढतच चालला आहे. कांगनाने आज पुन्हा एकदा ट्विट करत आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

Advertisements


कंगनाने तिच्या ट्विटमधून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे. ती आपल्या ट्विट मध्ये म्हणाली की, महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेते आणि आदर्श होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची परिस्थिती पाहून त्यांची भावना काय असली असती. असा सवाल तिने केला आहे. 


यापूर्वी कंगना मुंबईत पोहोचायच्या आधीच मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई केली. कारवाईस सुरुवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगनाने मुंबई पाकिस्तान झाली असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत उध्दव ठाकरे आज तुम्ही माझे घर तोडले आहे उद्या तुमचे गर्वहरण होईल, असे म्हटले होते. 

Related Stories

मिसिसीपी प्रांत ध्वज बदलणार

datta jadhav

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

pradnya p

पुणे : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची बाधा

pradnya p

चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध

datta jadhav

आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

pradnya p

तामिळनाडू : गेल्या 24 तासात 5,175 नवे कोरोना रुग्ण; तर 112 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!