तरुण भारत

सातारा : वाई कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस बंद

प्रतिनिधी/वाई

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस शेतकर्‍यांची गर्दी वाढत आहे. यातच कोरोना रुग्णांची वाढती काही केल्या कमी होत नाही. ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी येत्या शनिवार आणि रविवारी वाई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संचालक अधिकारी आणी कर्मचार्‍यांनी घेतला असल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी दिली.

यावेळी बोलताना पिसाळ म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून कोरोनो महामारीने वाई शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात धुमाकुळ घालण्यास सुरवात केली. आज अखेर तालुक्यात २ हजार कोरोनो बाधित रुग्ण आढळले आहेत तर ३८ रुग्णांना उपचारा दरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाईचे महसूल, पोलीस, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे हे सर्व प्रशासनातील अधिकारी एकत्रीत येऊन हा फैलाव रोखण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत.

यातच बाजार समिती मध्ये दररोज पहाटे आणी सायंकाळी शेतकरी आपला तरकारी भाजीपाला विक्री साठी आणतात. हा माल खरेदी साठी रायगड जिल्ह्यातील महाड रोहा अलिबाग पोलादपुर खेड इंदापुर चिपळूण या भागातील मोठ मोठे व्यापारी शेकडोच्या संख्येने येतात. त्यामुळे बाजार समिती मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यातून कोरोनो रोगाला आमंत्रण मिळु नये याची खबरदारी घेण्यासाठी वाई कृषी उत्पन्न बाजार समिती स्वयम स्फृर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

पाठलाग करून दीड लाखांचा ऐवज लांबवला

datta jadhav

सातारा : फाळकूट भाईच्या दारू गुत्यावर पोलिसांचा छापा

Abhijeet Shinde

20 महिन्यानंतर…स्कूल चले हम..!

datta jadhav

सातारा : प्रतापसिंह शेती फार्ममधील उसाला लावली आग

datta jadhav

जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर

Patil_p

व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या अथवा दहा हजाराची तातडीची मदत करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!