तरुण भारत

अडवई सत्तरी पोलीस चौकीचे उद्घाटन

वाळपई: समाजातील गुन्हेगारी नष्ट करायची असेल तर नागरिक पोलिसांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. फक्त पोलिस यंत्रणेवर दोषारोप करून आपली जबाबदारी झटकण्याएवजी नागारिकांनी आपल्या सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून पोलिसांना सहकार्य केल्यास समाजातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस खात्याला महत्त्वाची मदत होणार असल्याचे प्रतिपादन डिचोली पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे यांनी केले आहे.
पंचायत क्षेत्रातील अडवई पेडानी याठिकाणी पोलीस चौकीचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते .पोलीस खात्याचा ध्वज फडकावून याकेंद्राचे उद्घाटन पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे पंच सभासद सदा गावकर पल्लवी गोवेकर समिल बागी उपनिरीक्षक रागोबा कामत व इतर अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना गुरुदास गावडे यांनी सांगितले की भिरोंडा सरपंच उदयसिंह राणे यांच्या प्रयlनातून याठिकाणी केंद्राची सुरुवात करण्यात आलेली आहे. यामुळे येणार्‍या काळात नागारिकांना चांगल्या प्रकारे फायदा होणार असून नजीकाठिकाणी असलेल्या सरकारी माध्यमिक विद्यालह्यालाहि याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार असल्याचे प्रतिपादन केले. निरीक्षक सागर एकोस्कर यांनी याकेंद्रावर कोणत्याहि प्रकारची अडचण व समस्या निर्माण होणार नाहि यासाठी आपण विशेष लक्ष देणार असल्याचे.
नद्³यावरील अंदाधुंदी बंद होणार – सरपंच उदयसिंह राणे. सरपंच उदयसिंग राणे यांनी यावेळी बोलताना याकेंद्राच्या सुविधेसाठी सहकार्य करणारे स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे विशेष आभार मानले.

Related Stories

कोविड निगा केंद्राला विरोध राजकीय प्रेरणेनेच !

omkar B

माजी मंत्री मिकी पाशेकोविरुद्धची सुनावणी तहकूब

omkar B

संतोबा देसाई ग्रुपतर्फे मजुरांच्या जेवणाची सोय

omkar B

किरण ठाकुर आज बीग एफएमवर

Patil_p

वेदांत-परुळेकर खाण कंपनीची याचिका दाखल

Patil_p

रेल्वे अधिकाऱयाने मागितली एलिनाची माफी

Patil_p
error: Content is protected !!