तरुण भारत

सप्ताहाच्या अंतिम दिवशी तेजीची झुळूक

सेन्सेक्स 14.23 नी वधारला : रियल्टी, टेकचे समभाग नफ्यात

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार तेजीची झुळून नोंदवत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये  दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 14.23 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,854.55 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला निफ्टी 15.20 च्या तेजीसोबत 11,464.45 वर स्थिरावला आहे.

दिवसभरात देशातील बाजारावर जागतिक पातळीवरील प्रभाव राहिला आहे. यामध्ये प्रामुख्याने आयटी आणि रियॅल्टी या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. विप्रो कंपनीचे समभाग 2.81 टक्क्मयांनी नफ्यात राहिले असून सोबत टेक महिंद्राचे 1.83 ने वधारले आहेत. रियॅल्टीच्या समभागात प्रेस्टीज आणि डीएसएफचे समभाग क्रमशः 3 आणि 2 टक्क्मयांनी वाढले आहेत. तसेच बँकिंगचे समभाग दुपारनंतर खरेदी झाल्याने स्टेट बँकेचे समभाग नफ्यात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत विप्रो 2.81, एसबीआय 2.80, टेक महिंद्रा 1.83, टीसीएस 1.68 आणि हिरो मोटोकॉर्प 1.43 टक्क्मयांनी नफ्यात राहिले आहेत. मात्र झी एन्टरटेन्मेंट 2.22, इंडसइंड बँक 1.68, पॉवरग्रिड 1.58, भारत पेट्रोलियम 1.53 आणि कोल इंडिया यांचे समभाग 1.18 टक्क्मयांनी नुकसानीत राहिले आहेत.

सेन्सेक्समध्ये 2,872 कंपन्यांच्या समभागामध्ये टेडिंग झाले असून यामध्ये 1,411 कंपन्यांचे समभाग वाढले आहेत तर 1,273 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवरील शेअर बाजारात गुरुवारी घसरण राहिल्याचे पहावयास मिळाले होते. तसेच दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाची वाढती संख्या ही गुंतवणूकदारांमध्ये दबावाचे वातावरण निर्माण करत असल्याचा अंदाज शेअर बाजारातील तज्ञांनी यावेळी क्यक्त केला आहे. यामुळे आगामी काळात देशातील शेअर बाजार कोणत्या वळणावर कार्यरत राहणार आहे हे आताच्या घडीला सांगणे तसे अवघड आहे.

Related Stories

म्युच्युअल फंडकरता वेळ वाढवली

Patil_p

दुबई एक्स्पो वर्ल्ड प्रदर्शन 2020 लांबणीवर

Patil_p

रिलायन्स रिटेलमध्ये अबुधाबीची मुबादला करणार 6,247 कोटींची गुंतवणूक

Patil_p

फास्टॅगच्या आधारे डिसेंबरमध्ये कर संकलन 200 कोटींनी वाढले

Omkar B

युपीआयचे 223 कोटीहून अधिक व्यवहार

Patil_p

काथ्या व अन्य उत्पादनाची निर्यात उच्चांकी पातळीवर

Patil_p
error: Content is protected !!