तरुण भारत

कोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यू

75 पॉझिटिव्ह, 50 जणांना डिस्चार्ज : कोरोना मुक्त संख्या 1153

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्ण वाढीबरोबरच मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. धक्कादायक म्हणजे शुक्रवारी एकाच दिवशी चौघाजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 37 वर पोहोचली आहे. गेल्या पंधरा दिवसांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नव्याने 75 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर आणखी 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली.

कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण इतर जिल्हय़ांच्या तुलनेत कमी असण्यामध्ये सिंधुदुर्ग तिसऱया क्रमांकावर आहे. परंतु आता मात्र मृत्यू दर वाढू लागला आहे. 1.3 वरून 1.7 वर मृत्यू दर पोहोचला आहे. शुक्रवारी सावंतवाडी खासकीलवाडा येथील 77 वषीय वृद्ध, डेगवे येथील 80 वषीय वृद्ध, निरवडे येथील 52 वषीय तरुण आणि वेंगुर्ले येथील 60 वषीय महिला या चौघांचा मृत्यू झाला आहे.

76 पॉझिटिव्ह, 50 जणांना डिस्चार्ज

जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 249 एवढी झाली आहे. तर बरे झालेल्या आणखी 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

तपासण्यात आलेले एकूण नमुने                                           19044

आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने                                                2249

आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने                                      16420

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                                              375

सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण                                  1061

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या                                             37

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण                                              1153

गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती                8652

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती               4527

Related Stories

सेंट लुक्स हॉस्पिटलमध्ये ओपीडी तात्काळ सुरू करा!

NIKHIL_N

8,077 शेतकरी, 32.69 कोटी जमा

Patil_p

मालवणात दोन दिवसात 12 जण दाखल

NIKHIL_N

रत्नागिरी : महिला रुग्णालय आता कोरोना रुग्णालय – पालकमंत्री ॲड.परब

triratna

कोकणात रुजलाय जगातील सर्वात महाग काळा तांदूळ

triratna

राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी शहर दहावे

Patil_p
error: Content is protected !!