तरुण भारत

देशातील बाधितांची संख्या 45 लाखांच्या पुढे

दिवसभरात 96 हजार 551 नवे रुग्ण : आतापर्यंत केवळ महाराष्ट्रात 9 लाख 90 हजार पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील कोरोनाचा वेग अनियंत्रित झाला आहे. देशात दररोज एक नवीन विक्रम तयार होत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 96 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, कोरोना प्रकरणांची एकूण आकडेवारी 45 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत देशात या विषाणूमुळे 76 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात जवळजवळ 9 लाख 43 हजार 480 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच 35 लाख 42 हजार 663 जण आतापर्यंत या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात 70 हजार 880 जणांना इस्पितळांमधून डिस्चार्ज देण्यात आला.  राजधानी दिल्लीत कोरोनाचा वेग थांबत नाही.

भारताव्यतिरिक्त कोरोना विषाणूने जगातील इतर देशांमध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक मृत्यूंमध्ये अमेरिका अव्वलस्थानी आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 96 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझील दुसऱया क्रमांकावर असून तिथे 1 लाख 29 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये भारत तिसऱया क्रमांकावर असून आत्तापर्यंत भारतात 76 हजारपेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांमधील नवीन प्रकरणातील आकडेवारीने राजधानीतील सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या 24 तासांत येथे 4,308 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 28 लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात दिल्लीत प्रथमच इतके रुग्ण वाढले आहेत. यासह दिल्लीतील कोरोनाचे एकूण रुग्ण अडीच लाखांच्या पुढे गेले आहेत. सध्या दिल्लीत सुमारे 25 हजार सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे 23,446 नवीन रुग्ण

गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 23,446 नवीन रुग्ण आढळल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 9 लाख 90 हजार 795 वर पोहोचली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱयाने ही माहिती दिली. राज्यात 24 तासांत 23,816 लोक बरे झाले आहेत. याशिवाय 448 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 28,282 वर गेली आहे.

Related Stories

पाचवी बैठक निष्फळ; कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम

datta jadhav

आयकर विवरणपत्र भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

देशातील पहिले गो-कॅबिनेट मध्यप्रदेशात

Omkar B

दिल्लीत दिवसभरात 4 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण; 86 मृत्यू

pradnya p

राहुल यांनी घेतला मासेमारीचा आनंद

Patil_p

माजी न्यायाधीश कर्णन यांना अटक

Omkar B
error: Content is protected !!