तरुण भारत

ड्रॅग रॅकेट: अभिनेत्री संजनाला भेटलो नाही: आमदार जमीर अहमद

बेंगळूर/प्रतिनिधी

माजी मंत्री आणि आमदार जमीर अहमद खान यांनी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अटक झालेली अभिनेत्री संजनाला ओळखत नसल्याचे म्हंटले आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना आमदार जमीर अहमद यांनी स्पष्टीकरण देताना मी संजनाला ओळखत नाही तसेच तिला कधीच भेटलेलो नाही. प्रशांतने त्याच्यावर चुकीचा आरोप केला आहे असे त्यांनी म्हंटले.

आमदार जमीर अहमद खान यांनी प्रशांतविरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांचे मादक पदार्थांच्या व्यवसायात नाव समाविष्ट करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही केंद्रीय तपास पथकाने करावी असे त्यांनी म्हंटले आहे.

चौकशी झाल्यास मी त्याचे स्वागत करीन आणि तपासात सहकार्य करीन असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच दोषी आढळल्यास मी माझी संपूर्ण मालमत्ता सरकारकडे देण्यास तयार आहे आणि त्याप्रकरणी कोणत्याही शिक्षेला सामोरे जावे लागले तर मी तयार असल्याचे म्हंटले आहे.

आमदार खान यांनी कॅसिनोचा मालक शेख फाझिल याच्याविषयी काही माहिती नाही. चार वर्षांपूर्वी मी एकदा त्याला भेटलो. बरेच लोक त्यांना भेटायला येतात. प्रत्येकाचे चेहरे लक्षात ठेवणे अशक्य आहे असे त्यांनी म्हंटले आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटकात लव्ह जिहादमुळे होणारे धर्मांतर थांबेल: मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

बेंगळुरात आज ऑक्सिजन एक्स्प्रेस होणार दाखल

Amit Kulkarni

सीईटी : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Amit Kulkarni

कर्नाटक : आमदार नारायण राव यांची प्रकृती चिंताजन

Abhijeet Shinde

कर्नाटक: मंत्रिमंडळाची सरकारी कर्मचार्‍यांना कॅशलेस वैद्यकीय उपचार देण्यास मान्यता

Abhijeet Shinde

कर्नाटक : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!