तरुण भारत

राशिभविष्य

रवि. दि. 13 ते 19 सप्टेंबर 2020

मेष

Advertisements

या सप्ताहात कन्या राशीत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. हिशोबात गफलत होऊ शकते. प्रवासात घाई करू नका. नोकरीत निष्कारण तुमच्यावर वरिष्ठांचा रोष होईल. कामात लक्ष द्या. संयमी भूमिका ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. विलंबाने तुमची कामे होतील. संसारात समस्या येईल.

वृषभ

या सप्ताहात कन्या राशीत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. समस्या सोडवा. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. हळूहळू आर्थिक घडी नीट करा. जास्त विश्वास टाकू नका. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व द्या. लोकांच्या समस्या सोडवा. कायद्याच्या  संबंधी काम करून घ्या. संसारात लक्ष द्यावे लागेल.

मिथुन

या सप्ताहात कन्येत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्या. कठीण काम करून घ्या. मनोबल टिकून राहील. धंद्यात काम मिळेल. जास्त मोह ठेवू नका. नोकरीत गुप्त गोष्टी राखून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्याकडे जबाबदारीचे काम दिले जाईल. बोलतांना सावध रहा. मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल.

कर्क

या सप्ताहात कन्येत रवि, वृषभेत राहू,  वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. जुनी समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. वसुली करा. नोकरीत वरिना खूष कराल. प्रकृती सुधारेल. दडपण कमी होईल. उत्साहवर्धक घटना संसारात घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार वाढेल. गैरसमज दूर होईल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल.

सिंह

या सप्ताहात कन्येत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. धंद्यात खर्च वाढेल. कामासंबंधीची चर्चा यशस्वी होईल. गोड बोलण्यावर फसू का. नोकरीतील तणाव कमी होईल. वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यातील त्रुटी सुधारता येतील. वेगाने महत्त्वाची कामे करा. कायद्यासंबंधी  प्रश्न रेंगाळत ठेवू नका. खाण्याची काळजी घ्या.

कन्या

तुमच्याच राशीत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यास सुरुवात होईल. वाहन हळू चालवा. राग वाढू देऊ नका. धंद्यात मोठे काम मिळेल. मागील येणे वसुल करा. नोकरीत सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांच्या सांगण्यावरून तुमचे तुम्ही ठरवू नका. स्वत:च्या कामात प्रगती करा. संसारात चांगली घटना घडेल.

तुळ

या सप्ताहात कन्येत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. धंद्यात विचारपूर्वक बोला. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी टिकवा. वरिष्ठांच्या विरोधात बोलू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टिका होईल. प्रक्षोभक बोलणे टाळा. तुमच्यावर अन्याय होण्याची शक्मयता आहे. गुप्त कारवाया वाढतील. संसारात चिडचिडेपणा होईल. कायदा सर्वत्र पाळा.

वृश्चिक

या सप्ताहात कन्येत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. कायद्याच्या संबंधी सावधपणे निर्णय घ्या. वसुली करा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त कारवायांना ऊत येईल. मान, प्रतिष्ठां टिकवता येईल. समोरच्या क्यक्तीचा डाव ओळखा. संसारातील समस्या सोडवता येईल. मार्ग मिळेल, दुर्लक्ष करू नका.

धनु

या सप्ताहात कन्या राशीत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्या प्रगतीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. रविवार, सोमवार मन अस्थिर होईल. मैत्रीत तणाव होईल. संसारात वाद वाढेल.  खाण्या-पिण्याची काळजी घ्या. धंद्यात तडजोड करावी लागेल. चातुर्याने बोला. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. जवळच्या माणसांना नीट पारखून ठेवा.

मकर

या सप्ताहात कन्या राशीत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. मंगळवार, बुधवार प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. पोटाची काळजी घ्या. नोकरीतील समस्या कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यातील त्रूटी सुधारता येतील. उत्साह वाढेल. मैत्री होईल. संसारात चांगली बातमी मिळेल. कला, साहित्यात कल्पनाशक्तीचा वापर करा.

कुंभ

या सप्ताहात कन्येत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. स्वत:ची, घरातील लोकांची काळजी घ्या. मनस्ताप देणारी घटना घडेल. मोह आवरा. धंद्यात मिळते, जुळते धोरण ठेवा. नोकरीत कायदा पाळा व काम करा. राजकीय, सामाजिक कार्यात गंभीर विधान करू नका. स्वत:च्या प्रतिष्ठांची काळजी घ्या. कला, साहित्यात विरोध होईल. खर्च वाढेल.

मीन

 या सप्ताहात कन्येत सूर्य, वृषभेत राहू, वृश्चिकेत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्या प्रत्येक कार्याला नवी दिशा देता येईल. आळस सोडून कामास लागा. नोकरी मिळवा. धंद्यात सुधारणा होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. मुद्दे प्रभावी ठरतील. लोकप्रियता मिळेल. योजना पूर्ण करा. कला, साहित्यात प्रगती कराल. ओळखी वाढतील.

Related Stories

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि.20 नोव्हेंबर 2021

Patil_p

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 23 जून 2020

Patil_p
error: Content is protected !!