तरुण भारत

कर्नाटक : वृद्धांना मासिक पेन्शन घरपोच मिळणार : महसूलमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

आता ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनसाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही, पेन्शनची ही रक्कम त्यांच्या घरी पाठविली जाईल. असे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सांगितले. तुमकूर जिल्ह्यातील तहसील कार्यालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास सहभागी झाले होते त्यांनी राज्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मासिक पेन्शनसाठी ७ हजार कोटी रुपये दिले जात आहेत. तसेच त्यांना इथून पुढे घरपोच पेन्शन मिळणार असल्याचे म्हंटले.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी पेन्शन वाटप सर्वप्रथम बळ्ळारी व उडुपी जिल्ह्यात करण्यात आली. या योजनेच्या यशानंतर आता ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्याचे वय ६० असेल त्यानुसार या योजनेचा त्यांना लाभ मिळेल. ही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने यापुढे या योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही.

प्रत्येक तहसीलमधील रूग्णालये, शाळा व इतर मूलभूत सुविधांसाठी जमीन चिन्हांकित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वेळी कायदा व संसदीय कार्यमंत्री जे.सी. मधुस्वामी, वनमंत्री आनंदसिंग, विधानपरिषदेचे सदस्य वाय.ए. नारायणस्वामी, तहसील पंचायत अध्यक्ष चांद्रया उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

ड्रग्स प्रकरण: माजी ‘बिग बॉस’ कन्नड स्पर्धक अदम पाशाला एनसीबीकडून अटक

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनानंतर पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटक: एसआरटीसी कर्मचारी नाराज

Abhijeet Shinde

कर्नाटक: कोरोना नियमांचे उल्लंघन सुरु राहिल्यास कठोर कारवाई हाच पर्याय : सुधाकर

Abhijeet Shinde

बेळगाव: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Shinde

50 टक्के लसीकरण केंद्रे बंद : सिद्धरामय्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!