तरुण भारत

अफगाण-तालिबान शांतता चर्चेला प्रारंभ

अमेरिकेचे विदेशमंत्री पॉम्पियो दोहामध्ये पोहोचले

वृत्तसंस्था / दोहा

Advertisements

अफगाण सरकार आणि तालिबान यांच्यातील कित्येक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी कतारची राजधानी दोहामध्ये शनिवारपासून शांतता चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत भारतही सामील होऊ शकतो असे मानले जात आहे. चर्चेत सुमारे 30 देशांचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे विदेशमंत्री माइक पॉम्पियो दोहा येथे पोहोचले आहेत.

ही चर्चा अफगाण सरकार आणि तालिबानची कसोटीच ठरणार असल्याचे उद्गार अफगाणिस्तानसाठीचे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी आणि ही चर्चा घडवून आणणारे जालमे खलीलजाद यांनी काढले आहेत. चर्चेद्वारे दशकांपासून सुरू असलेले युद्ध संपविता येता येणार आहे आणि अमेरिकेच्या सैनिकांची वापसी सुरू होऊ शकेल. तसेच दोन्ही बाजूंदरम्यान एक राजकीय रोडमॅपसंबंधी सहमती निर्माण होऊ शकणार आहे. दोन्ही बाजूंना चर्चेद्वारे एकत्र ठेवण्यासह स्थितीवर अमेरिका नजर ठेवणार असल्याचे खलीलजाद म्हणाले.

अफगाणिस्तानात शांततेसाठी अमेरिका आणि तालिबान यांच्यात 29 फेब्रुवारी रोजी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. यांतर्गत तालिबानने हिंसाचारात घट करणे अपेक्षित होते. तर अमेरिकेने अफगाणिस्तानातून स्वतःचे सैनिक अनेक टप्प्यांमध्ये मागे घेण्याची तरतूद होती. करारानुसार तालिबानला अल-कायदा आणि अन्य दहशतवादी गटांसोबतची साथ सोडावी लागणार आहे. अफगाण सरकारशी संबंधित लोकांवरील हल्लेही रोखावे लागणार आहेत.

5,000 दहशतवाद्यांची सुटका

शांतता चर्चा सुरू करण्यासाठी अफगाण सरकारने यंदा तालिबानच्या 5,00 दहशतवाद्यांची मुक्तता केली आहे. यातील 400 दहशतवाद्यांनी अनेक सैनिक आणि नागरिकांची हत्या केली होती. अशरफ गनी सरकारने मागील आठवडय़ात 3200 सामुदायिक नेते आणि राजकारण्यांची बैठक बोलाविली होती. सर्वांच्या सूचनेनंतरच कैद्यांच्या मुक्ततेचा निर्णय घेण्यात आला आहे.

..तर ट्रम्प यांना लाभ

अफगाणिस्तानातून सैनिक मागे घेण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. ही शांतता चर्चा अमेरिकेच्या दबावामुळेच पुढे सरकली आहे. चर्चा यशस्वी ठरल्यास निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांना लाभ मिळणार आहे. अफगाणिस्तानात नोव्हेंबरपर्यंत 5 हजारापेक्षाही कमी अमेरिकन सैनिक राहतील असे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी म्हटले होते.

Related Stories

पाकच्या पंतप्रधानांची फजिती

Amit Kulkarni

जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत ऍड. युवराज नरवणकर

Abhijeet Shinde

जर्मनीत नियंत्रण

Omkar B

कामावर नव्हता तरीही 15 वर्षांपासून वेतन

Patil_p

श्वानाच्या पेंटिंगचे होतेय कौतुक

Patil_p

सोलोमन बेटांवर आढळला बालकाच्या आकाराचा बेडूक

Patil_p
error: Content is protected !!