तरुण भारत

विद्यापीठ परीक्षांना अखेर मुहुर्त

पदवी अंतिम सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांची माहिती
नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा 10 ऑक्टोबर
तर बॅकलॉगच्या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून होणार सुरु
बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा
प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प परीक्षा 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

शिवाजी विद्यापीठातील पदवीच्या अंतिम सत्रांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा 10 ऑक्टोबर तर बॅकलॉगच्या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. या परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार असून 50 गुणांसाठी एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. नियमीत परीक्षेसाठी 45 हजार तर बॅकलॉगच्या 30 हजार असे एकूण 75 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.

नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रक व हॉलतिकीट संगणक प्रणालीतून उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 50 गुणांसाठी बहुपर्यायी पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षा ऑनलाईन प्रणालीतून होणार आहे. त्यामुळे नियमित, बॅकलॉग आणि दूरशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक महाविद्यालय, अधिविभागामार्फत 17 सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे बंधनकारक आहे.

परीक्षांचे वेळापत्रक महाविद्यालय, अधिविभाग स्तरावर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 50 गुणांची, एक तासाची, बहुपर्यायी पध्दतीने महाविद्यालय, अधिविभागस्तरावर होणार आहे. प्रश्नपत्रिकाही संबधित महाविद्यालय, अधिविभागातील प्राध्यापकांकडून तयार करुन घेतल्या जाणार आहेत. परीक्षेसंदर्भातील सर्व कामे महाविद्यालय, अधिविभाग स्तरावर करण्यात येणार आहे. दूरशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या-त्या महाविद्यालय, अभ्यास केंद्रावर होणार आहेत. याबाबत शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राकडून मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना पत्रकाव्दारे देण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञानाव्दारे परीक्षा घेण्याची अधिविभागप्रमुखांसह प्राचार्यांना मुभा
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प परीक्षा 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहेत. दिलेले गुण संगणक प्रणालीत भरण्यासाठी आवश्यक लिंक 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात न बोलविता तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा घेण्याची मूभा अधिविभाग प्रमुख, प्राचार्यांना दिली आहे. परीक्षा घेताना सध्या असणाऱया प्रात्यक्षिक परीक्षेच्या कमाल गुणामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास सर्वेच्च प्राधान्य द्या…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन परीक्षा पद्धतीचा अवलंब करावा. सर्वच परीक्षांसाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. परीक्षार्थीची कोणतीही तक्रार विद्यापीठाकडे येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना परिपत्रकात केल्या आहेत.

Related Stories

केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांचे निधन

Abhijeet Shinde

कोरोनामुक्ती’त कोल्हापूर राज्यात टॉप

Abhijeet Shinde

खोचीतील पूरग्रस्तांना दोन वर्षानंतरही मदत नाही

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथील मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

Abhijeet Shinde

नागेवाडी कुस्ती मैदानात पै. सूरज निकम विजयी

Abhijeet Shinde

सांगली : वसंतरावदादा अभियांत्रिकीच्या “ऑटोमॅटिक पीनट शेलिंग मशीन”ला पेटंट प्राप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!